काँग्रेसच्या माजी आमदाराची 10 लाख रुपयांना फसवणूक; दिल्लीतील नेत्याची भेट घेण्याचं आश्वासन देत गंडवलं
राष्ट्रीय नेत्यासोबतच्या बैठका आयोजित करण्यासाठी आणि त्यांच्या सोशल मीडिया मोहिमेचे व्यवस्थापन करण्यासाठी दहा लाख रुपये देण्यास तयार केले.

Crime News: निवडणुकीदरम्यान दिल्लीतील नेत्याला भेटवतो म्हणत तसेच सोशल मीडिया मॅनेज करण्याच्या नावाखाली माजी काँग्रेस आमदाराची दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या समोर आले आहे. हरियाणातील बल्लभगड येथील एका माजी काँग्रेस आमदाराची राष्ट्रीय नेत्यासोबत बैठक आयोजित करतो, सोशल मीडिया मॅनेज करतो अशा नावाखाली ही फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. शारदा राठोड यांच्या तक्रारीच्या आधारावर सेक्टर 17च्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (Hariyana Crime News)
आरोपीला सोशल मीडियासाठी पैसे दिले पण..
काँग्रेसच्या माजी आमदार शारदा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या आरोपी बृजभूषण शर्माला भेटल्या होत्या. आरोपीने स्वतःला ज्येष्ठ राष्ट्रीय नेत्यांच्या जवळचा सहकारी म्हणून ओळख करून दिली होती. आरोपीची मुलगी भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी असल्याचं त्याने सांगितलं होतं. तर त्याचा मुलगा सोशल मीडिया मॅनेजर असल्याचा त्याचा दावा होता. हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेत्या शारदा राठोड यांनी असा आरोप केला आहे की त्यांना आणि त्यांच्या आईला आरोपी बृजभूषण शर्मा यांच्या घरी चहासाठी आमंत्रण देण्यात आले होते. तिथे त्यांची पत्नी आणि मुलगा देखील उपस्थित होते.
बैठका आयोजित करताे म्हणत 10 लाख दिले पण..
शर्मांच्या कुटुंबियांनी राठोड यांना राष्ट्रीय नेत्यासोबतच्या बैठका आयोजित करण्यासाठी आणि त्यांच्या सोशल मीडिया मोहिमेचे व्यवस्थापन करण्यासाठी दहा लाख रुपये देण्यास तयार केले. मात्र पैसे घेतल्यानंतर शर्मा यांनी राठोड यांचे कोणत्याही राजकारण्याशी ओळख करून दिले नाही तसेच सोशल मीडियाचा कोणतही काम केलं नाही अशी तक्रार शारदा राठोड यांनी पोलिसांकडे केली आहे. वारंवार पैसे मागितले तेव्हा आरोपीला प्रत्येकी आठ लाख रुपयांचे दोन चेक दिले मात्र दोन्हीही बाउन्स झाल्याचे सांगत आरोपीच्या वकिलांनी हे दावे फेटाळले आहेत. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी हरियाणा पोलीस करत आहेत.
हेही वाचा:























