एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये राहत्या घरात प्राध्यापकाचा गळा चिरून निर्घृण खून

सिडकोमध्ये एका रात्रीतच दोघांचा खून झाल्याने पुन्हा एकदा औरंगाबाद शहर असुरक्षित असल्याचं अधोरेखित झालंय. 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडकोतल्या उच्चभ्रू वसाहतीतील एका  प्राध्यापकाचा गळा चिरून निर्घृण खून झाल्यानं औरंगाबाद हादरलं आहे. सिडकोमध्ये एका रात्रीतच दोघांचा खून झाल्याने पुन्हा एकदा औरंगाबाद शहर असुरक्षित असल्याचं अधोरेखित झालंय. 

औरंगाबाद शहरातल्या सिडको एन 2 या उच्चभ्रू वस्तीतल्या या घरात रात्री प्राध्यापक राजन शिंदे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. सकाळी कुटुंबातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात राजन शिंदे यांना पत्नी आणि कुटुंबायांनी पाहिले. त्यानंतर वाऱ्यासारखी माहिती शहरभर पसरली. पोलिसांचे पथक तातडीने पोहचून तपास सुरू केला. सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यासह शहरातले डीसीपी, एसीपी, क्राईम ब्रँच यांनी चौकशी सुरू केली. मात्र अजून तपास सुरू आहे, तीन वेगवेगळ्या दिशेने आमचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहाटे साडेपाच वाजता राजन शिंदे यांच्या घरात रडण्याचा आवाज येताच सिडको एन 2, ठाकरेनगरमधील लोक धावत पळत घरी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात असताना त्यांना पाहिल्यानंतर धक्काच बसला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. कपाळावर सुद्धा वार असल्यामुळे संपूर्ण चेहरा रक्ताने माखून गेला होता. इतकंच नाही तर खून करणाऱ्यांनी क्रूरपणे दोन्ही हाताच्या मनगटावर वार करून हाताच्या शिरा तोडल्या होत्या. कुटुंबातील सदस्य उठण्याअगोदर त्यांचा मुलगा उठला होता, असं आजूबाजूंच्या लोकांचं म्हणणं आहे. उठल्यानंतर तो चारचाकी कार काढून जवळ असलेल्या एमआयटीमधून रुग्णवाहिका आणण्यासाठी गेला. त्याच्या गाडीला धडक लागल्यानंतर त्यांनी तिथेच गाडी सोडली आणि रुग्णवाहिका घेऊन घरी पोहोचला. तोपर्यंत लोक जमले होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला.

पोलिसांची मोठी टीम सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत घरातच ठाण मांडून होती. मात्र तपास सुरू असल्याचं सांगून खून कोणी का केला याचे उत्तर मात्र पोलिसांनी सांगितलं नाही. त्यामुळे घरात घुसून  खून झालाच कसा असा प्रश्न औरंगाबादकरांना पडलाय. इतकच काय ही घटना घडण्याच्या केवळ पाच तासापूर्वी सिडकोमध्येच भर रस्त्यावर दारूच्या दुकानाजवळ खून झाला. त्यामुळे औरंगाबाद शहर सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget