Amravati : वॉंटेड आरोपीला पकडण्यासाठी अकोला पोलिसांचा अमरावतीमध्ये हवेत गोळीबार, आरोपी ताब्यात
अकोला पोलीस आरोपीच्या पाठलाग करत अमरावतीमध्ये पोहोचले, त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर बंदुक रोखली.
अमरावती : एका वॉंटेड आरोपीला पकडण्यासाठी अमरावती शहरातील लक्ष्मीनगरमध्ये आज सकाळी 9 च्या सुमारास अकोला पोलीसांनी हवेत गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी एक हवेत आणि दुसरा चारचाकीच्या टायरवर गोळीबार करण्यात आला. आरोपींनी पोलिसांवर बंदुक रोखली त्यामुळे पोलीसांनी गोळीबार केल्याचं सांगण्यात येतंय. आरोपी हा चारचाकी घेऊन पळत जातांना विद्युत खांबावर धडक बसली आणि अकोला पोलिसांनी आरोपीला पकडले. अकोला येथील राजेश राऊत हा वॉंटेंड आरोपी होता. त्याला पकडायला अकोला पोलीस अमरावतीमध्ये आले होते.
अकोला येथील राजेश राऊत या आरोपीचा पाठलाग अकोला गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी करीत होते. बुलढाण्यापासून आरोपीचा पाठलाग सतत अमरावती लक्ष्मीनगर पर्यंत पाठलाग केला. त्यानंतर आरोपी राजेश राऊतला माहित झाल्यानंतर त्याने तिथून निघण्याकरिता पोलिसांवर बंदुक रोखली. बचाव करण्याकरिता पोलिसांनी एक हवेमध्ये आणि एक गाडीच्या टायरवर गोळीबार केला. त्यानंतर घाबरून आरोपी राऊतने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याची गाडी एका इलेक्ट्रिकच्या खांबावर जाऊन धडकली. अकोला गुन्हा शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी राऊतला पकडले.
पुढील तपास अकोला पोलीस आणि अमरावती गाडगे नगर हद्दीमध्ये झाल्यामुळे गाडगे नगर पोलीस घटनेचा पूर्ण तपास करत आहेत. आरोपीवर अकोला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
12 ऑगस्ट रोजीच अमरावती शहरातील पठाण चौक परिसरात अहमद खान याने गोळीबार केला. त्याचा नेम चुकला आणि ती गोळी एका विद्यार्थिनीला लागली होती. यात ती मुलगी जखमी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
- Aurangabad: दरोडेखोर पुढे पोलीस मागे..,अर्धा तास पाठलाग; 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीचा थरार
- Mukesh Ambani : अंबानींना जीवे मारण्याची धमकी, दहिसरमधून 57 वर्षीय संशयित ताब्यात
- Aurangabad: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घातल्या बेड्या, दोन महिलाही ताब्यात