एक्स्प्लोर

Mukesh Ambani : अंबानींना जीवे मारण्याची धमकी, दहिसरमधून 57 वर्षीय संशयित ताब्यात

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या फोन कॉल प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दहिसरमध्ये ही कारवाई करण्यात आली. 

आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याची तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्याच वेळी अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली. तर, एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला. दहिसरमधून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विष्णू भूमीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित आरोपी 57 वर्षीय असून मानसिक आजारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी दहिसर पश्चिममधील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात याआधीदेखील आरोपीविरोधात गुन्हे दाखल आहेत. 

मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे. 

रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी 'एबीपी' सोबत बोलताना सांगितले की, आम्हाला आठ फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. धमकीच्या फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली असून रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

'अँटिलिया'जवळ आढळली होती स्फोटकं असलेली कार

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. एका कारमध्ये जिलेटिनचा साठा सापडला होता. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी देण्यात आली होती. मात्र, या धमकी प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. अँटिलियाजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं आढळली, ती कार ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची होती. स्फोटकं आढळल्याच्या घटनेनंतर त्यांचा मृतदेह आढळला. हिरेन यांच्या हत्येचा आरोप वाझे यांच्यावर आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Embed widget