एक्स्प्लोर

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत

पोलिस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला.

गडचिरोली: नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये कायमच चकमक होत असल्याच्या घटना घडतात. मात्र, पोलिस जीवावर उदार होऊन नक्षली (Naxlite) मोहिमेविरुद्ध लढा देताना पाहायला मिळतात. आज गडचिरोलीत पुन्हा एकदा माओवादी कॅम्पचा पदार्फाश कला आहे. गडचिरोली-छत्तीसगड सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली असून गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांनी माओवाद्यांचा साहित्य साठाही जप्त केला आहे. त्यानंतर, विशेष अभियान पथकाची सुखरुपणे गडचिरोलीला पोहोचले आहे. 

मिळालेल्या विश्वासार्ह माहितीनुसार, कसनसूर - चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर दलम आणि औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे मौजा भिमनखोजी, नारकसा (पोस्टे गॅरापत्ती पासून 04 किमी उत्तरेला) जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित जमुन तळ ठोकून आहेत. या गोपनिय माहितीच्या आधारे  माओवादविरोधी अभियानाची योजना आखण्यात आला  नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ 113 बटा. अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. मौजा भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, अंदाजे दुपारी 3 वाजताच्या सुमारास माओवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असताना पोलिस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला.

माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरुन सोलार प्लेट 01 नग, माओवादी डांगरी (पँट) 02 नग, माओवादी पिट्टु 06 नग, चप्पल जोड 03 नग, ताडपत्री 03 नग, प्लॅस्टीक टेंट 02 नग, बेल्ट 07 नग, टेस्टर 02 नग, लाकडी मुठ असलेला पेचकस 01 नग, शॉल 02 नग, लुंगी 01 नग,  शर्ट (फुल) 04 नग, टी शर्ट 06 नग, लोअर पँट 02 नग, जॅकेट (हिरवा) 01 नग, दुपट्टे (हिरवे व लाल) प्रत्येकी 01 नग, कॅप 02 नग, बेडशिट 01 नग, मग (स्टिल) 04 नग, प्लेट (स्टिल) 06 नग, लायटर 02 नग, गंज (जर्मन) 02 नग, कैची 01 नग, मेडीकल किट, पाणी कॅन 05 नग इत्यादी दैनंदिन वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल

मोठ्या हॉस्पिलटने 8 लाख खर्च सांगितला, दुसरीकडे 128 रुपयांत रुग्ण बरा झाला; वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget