एक्स्प्लोर

अज्ञातांनी घरात घुसून बीडच्या तरुणाच्या गळ्यावरून चाकू फिरवला, रक्ताच्या थारोळ्यातच सोडला प्राण, संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार

एकटक पाहतो, कॉलर का उडवतो म्हणत 19 वर्षीय तरुणाची फ्लॅटवरच गळा चिरून हत्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शनिवारी महाविद्यालयातील मुलांशी झालेल्या किरकोळ वादानंतर संक्रांतीदिवशी फ्लॅटवरचे मित्र बाहेर गेले असताना  19 वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केली. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय आहे. मंगळवारी रात्री 11:30 वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठा गदारोळ उडाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. (Crime News)

मूळ माजलगावचा असलेला प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. एक मावसभाऊ आणि अन्य तीन मित्र, असे सोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. उस्मानपुरा भाग हा शहरातला गजबजलेला भाग असून महाविद्यालयीन मुलं मोठ्या प्रमाणात या भागात किरायाने रुम करून राहतात.

नक्की घडले काय?

मंगळवारी महाविद्यालयातून सर्व जण परतले. सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री 10 वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप गळा कापलेल्या रक्तबंबाळ मृतावस्थेतच दिसला. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांती रोजी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या फ्लॅटवर जात त्याला गळा चिरून मारून टाकले. मित्र फ्लॅटवर परत आले तेंव्हा प्रदीप रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.  घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उस्मानपुरा पोलीस ठाण्यात (Usmanpura Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय 19) असे आहे. प्रदीप हा बीड जिल्ह्यातील पिंपरखेड गावचा रहिवासी होता आणि शिक्षणासाठी सहा वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. तो शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. उस्मानपुरातील रेड कॉलनीत तो चार मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता.  या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कोयता गँगची दहशत

गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात कोयता गँगची दहशत वाढल्याच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारी टोळक्या सक्रीय झाल्या आहेत. किरकोळ कारणांमधून होणारे जीवघेणे हल्ले वाढले असताना या टोळक्यांवर जरब कशी बसवायची हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्येही वाळूज एमआयडीसी भगाात कोयता गँगची दहशत वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हातात कोयता घेत दुकानं फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात चोरीच्या घटनाही होताना दिसत असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raigad Politics: गोगावलेंच्या नव्या फॉर्म्युल्यावर तटकरेंची खिल्ली, रायगडमध्ये महायुतीत बिघाडी?
Mahayuti Crack: कर्जतमध्ये दादांची शिंदेंना सोडचिठ्ठी? आमदार Thorve 'ना 'टप्प्यात घेण्यासाठी' ठाकरेंना साथ
Beed Politics: 'कोणाची अॅलर्जी नाही, पण...', पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना त्यांच्याच मतदारसंघात थेट इशारा?
Farmer Distress: 'मदत मिळाली का?', Uddhav Thackeray मराठवाड्यात, सरकारला थेट सवाल!
Voter List Row : 'काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांची नावं डबल', महायुतीतील आमदार Sanjay Gaikwad यांचा घरचा आहेर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
Embed widget