एक्स्प्लोर

चंद्रपूरच्या कोरपणा येथील कॉन्वेंट शाळेत आणखी एक मुलीवर अत्याचार; शाळेत बोलावून आरोपीचे अश्लील वर्तन

Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीने आणखी एक मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे.

Chandrapur News चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपणा येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणाने (Chandrapur Crime) राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवली असताना, आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित मुलीच्या वर्गात शिकणाऱ्या आणखी एका 12 वर्षीय मुलीसोबत प्रकरणातील आरोपीने अश्लील वर्तन केल्याची माहिती पुढे आली आहे. उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या आधी प्रकरणातील संबंधित शाळेच्या संचालकावर  गुन्हा दाखल करण्यात आला  होता. शाळेचे संचालक हे आरोपीचे चुलत काका असून शाळेच्या संचालक मंडळात देखील ते सामील असल्याची माहिती पुढे आली होती.

दरम्यान,या प्रकरणी पॉक्सो कायद्याच्या (POCSO) कलम 21 अंतर्गत शाळेच्या संचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. अशातच या प्रकरणाची जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान पीडित मुलीच्या वर्गात शिकणाऱ्या आणखी एका 12 वर्षीय मुलीसोबत प्रकरणातील आरोपीने अश्लील वर्तन केल्याची माहिती पुढे आली आहे.पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आता पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल याची आम्हाला खात्री- चित्रा वाघ 

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नुकतेच कोरपणा येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या आईचे कौतुक केले आहे. पीडित मुलीच्या आईच्या हिंमतीमुळेच या प्रकरणाला वाचा फुटली, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरीब घरातल्या एका मुली सोबत झालेला हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानमध्ये काय काय चालतंय हे आम्हाला पाहायला मिळालं. या प्रकरणात पीडित मुलगी एकटी नसून आणखीही मुलींचं शोषण झाल्याची शक्यता आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल याची आम्हाला खात्री असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय? 

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपणा येथे उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकी देत आरोपीने पीडित मुलीला धमकावले. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आली. आरोपी हा युवक काँग्रेसचा (Congress) कोरपणा शहराध्यक्ष आहे. तर संबंधित शाळेच्या संचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य

चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...

बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत

Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..

मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..

Maharashtra Goverment: अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
Santosh Deshmukh case: उज्ज्वल निकमांच्या कोर्टातील युक्तिवादातील 'ती' गोष्ट दमानियांना खटकली, वेगळ्याच हालचालींचा संशय बोलून दाखवला
उज्ज्वल निकमांच्या कोर्टातील युक्तिवादातील 'ती' गोष्ट दमानियांना खटकली, वेगळ्याच हालचालींचा संशय बोलून दाखवला
Embed widget