एक्स्प्लोर

खळबळजनक! बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल; चंद्रपूरच्या बल्लारपूर येथील घटना 

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

Chandrapur Crime News :  चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.  चंद्रपूरच्या (Crime News) बल्लारपूर शहरातील ही धक्कादायक घटना असून राहत्या घरी आज दुपारी पीडित मुलीने आत्महत्या केलीय. सोमवारच्या रात्री पिडितेवर एका आरोपीने बल्लारपूर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला होता. दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर काल या प्रकरणी पोक्सो (POCSO) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर प्रकरणातील आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. मात्र, बलात्काराच्या घटनेने व्यतिथ होऊन पीडितेने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणानंतर मात्र परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.

मित्रावर गुन्हा दाखल झाला म्हणून आत्महत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी हा पीडित मुलीचा मित्र आहे. मैत्री दरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. सोमवारच्या रात्री पिडितेवर आरोपीने बल्लारपूर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला होता. दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सोमवारी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या बाबत माहिती मिळाली, त्यामुळे मुलीवर दबाव टाकून काल गुन्हा दाखल करण्यास तिला भाग पाडण्यात आलं. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोक्सो (POCSO) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र आपल्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली म्हणून मुलीने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या पोलीस या आत्महत्या मागील नेमकं कारण काय? याचा तपास करत आहे.  

खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडको (Cidco) परिसरात खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच (Teacher) 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली. मात्र, दुसऱ्या दिवशी तिने क्लासला जाण्यास नकार दिला. यानंतर पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला असता पीडित मुलीने आईला आपबिती सांगितली. घटनेची माहिती मिळतच पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget