कासा पोलिसांनी पुन्हा पकडला लाखो रुपयाचा गुटखा, एकाला अटक
पोलिसांनी केलेल्या कारवाईत कासा पोलिसांनी ८ लाख 83 हजार 500 रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो असा एकूण 19 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पालघर : चारोटी परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कासा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत कासा पोलिसांनी ८ लाख 83 हजार 500 रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो असा एकूण 19 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची कासा पोलीस तपासणी करत होते. चारोटी गावाच्या हद्दीत एका हॉटेलनजीक कंटेनर टेम्पो क्रमांक जे 09 जी.बी. 5563 या वाहनाची तपासणी केली असता, पोलिसांना त्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या कंटेनर टेम्पोमधील 8 लाख 83 हजार 500 रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व 11 लाख रुपये किमतीचा कंटेनर टेम्पो असा एकूण 19 लाख 83 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी कासा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीविरोधात कासा पोलीस ठाण्यात भादविस कलम 328, 272, 273, 188, 34 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमाने प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :