एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cake Cutting With Sword : तलवार, कोयत्याने केक कापणं महागात; पुण्यात एकाला बेड्या तर मुंबईतील तरुणाचा शोध सुरु

Cake Cutting With Sword : वाढदिवसाला तलवार तसंच इतर धारदार शस्त्राने केक कापण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरामध्ये असाचा प्रकार समोर आला आहे.

Cake Cutting With Sword : वाढदिवसाला तलवार (Sword) तसंच इतर धारदार शस्त्राने केक (Cake) कापण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या मोठ्या शहरामध्ये असाचा प्रकार समोर आला आहे. कोयता आणि तलवारीने केक कापणं दोन तरुणांच्या अंगलट आलं आहे. पुण्यात कोयत्याने केक कापून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर मुंबई तलवारीने 21 केक कापणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाविरोधात आर्म्स अॅक्टविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कोयत्याने केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पुण्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाला धारदार कोयत्याने केक कापणारा आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा आरोपी हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात सापडला आहे. अतिष लांडगे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक कोयता आणि 500 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे शहरात गेले अनेक दिवसांपासून असे केक कापून व्हिडीओ व्हायरल करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

तलवारीने 21 केक कापले, 17 वर्षीय मुलावर आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा
मुंबईत वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापणं एका मुलाला महागात पडलं आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील बोरिवली परिसरातील एमएचबी पोलिसांनी 17 वर्षीय मुलाविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी (16 एप्रिल) रात्री हा मुलगा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा करत होते. यावेळी या मुलाने तलवारीने तब्बल 21 केक कापले. या केक कटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची माहिती पोलिसांनाही मिळाली. अशाप्रकारणे तलवारीचा वापर करणे हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजच 17 सप्टेंबरला आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस आता या मुलाचा शोध घेत आहेत.

याआधी तलवारी केक कापण्याच्या अनेक घटना
आपला वाढदिवस संस्मरणीय ठरावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी वेगवेगळ्यो गोष्टींचं प्लॅनिंग केलं जातं. काही जण हॉटेल, पबमध्ये किंवा घरीच मोठ्या दणक्यात वाढदिवस साजरा करतात. तर काही जण काहीतरी हटके करण्यासाठी शस्त्राने केक कापतात. परंतु तलवारीने केक कापणं हा कायद्याने गुन्हा आहे.  तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन दहशत निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. याआधी वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मात्र हीच बाब त्यांना महागात पडते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget