Buldhana : सासरच्या मंडळींकडून जावयाला असाही 'प्रसाद'; 11 जणांविरोधात गुन्हा दाखल
पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाच्या पार्श्वभागात मिरची पूड व कारले कोंबल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा : आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन नंतर त्या जावयाचे हातपाय बांधून त्याच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून व कारले कोंबण्याची घटना मोताळा येथे 4 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडित 22 वार्षीय युवकाच्या तक्रारीवरुन सासरच्या 11 जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय.
जुन्नर तालुक्यातील 22 वर्षीय युवक हा 4 जुलै रोजी त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वसाहतीत आला होता. त्यावेळी युवकाचा सासरकडील मंडळीसोबत वाद झाला. त्यामुळे सासरकडील 11 जणांनी या युवकाचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली. इतकचं नाही तर त्याच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून कारले कोंबण्यात आले. अशा धक्कादायकरित्या त्या युवकावर अत्याचार करण्यात आले.
उपचारानंतर आज युवकाने बोराखेडी पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी 11 आरोपींच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपीना अटक केली आहे. इतर आरोपीना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झालंय.
जावयाने उपचार घेतल्यानंतर बरा झाल्यावर बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून सासर कडील रामराव पवार, विजय पवार, रवी पवार, राजू पवार, विकास पवार, देवकाबाई, छाया बाई, नंदाबाई, रेखाबाई पवार इत्यादी विरुद्ध तक्रार दिली आहे. यावरुन बोराखेडी पोलिसांनी भादवी 377, 143, 147, 149, 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत चार आरोपीना अटक केली आहे. यातील बाकी आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
- शिवसेनेचे 56 आमदार भाजपच्या जीवावर आल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...
- गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची चिखलात उतरून भात रोवणी; आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्याचे आवाहन