Buldhana Crime News : कुंपणानेच शेत खाल्ले! बनावट सोन्याचे दागिने, आभूषण तारण ठेवून कंपनीची लाखोंची फसवणूक
Buldhana Crime News : बुलढाणा शहरातील जनता चौकातील कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि. कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागिने, आभूषण तारण ठेवून कंपनीची मोठी फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे
Buldhana Crime News : बुलढाणा शहरातील जनता चौकातील कॅप्री ग्लोबल कॅपीटल लि. (Capri Global Capital Limited) कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागिने, आभूषण तारण ठेवून कंपनीची मोठी फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. यात तब्बल 26,21,472 रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शाखेतील कर्मचार्यांनी आपल्याच ओळखीचे व नातेवाईकांचे सोन्याचे दागिने ठेवून त्यांची कर्ज मंजूर केल्याचे समोर आले आहे. यात 3 ते 4 ग्राहक सुद्धा सहभागी असल्याचं समोर आल आहे.
विशेष म्हणजे रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड यांनी पोलिसात तक्रार दिल्याने शाखेतील सहा. शाखा प्रबंधक प्रविण गरकल, माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे, दिपाली साळवे, आश्विनी नागरे, राजेंद्र मोरे, अक्षय बरडे, किशोर बिबे, निलेश सारवळकर , अक्षय बरडे, किशोर बिबे, निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर व मेकर यांच्या विरोधात पोलिसांनी भान्यासं (बीएनएस) नुसार 3(5),316(2)318(4) गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
विघ्नेश्वरा हायब्रीड सीड कंपनीच्या मुन्नीनं केली शेतकऱ्यांची फसवणूक
दबंग सिनेमातील मलाईका अरोरावर चित्रित मुन्नी बदनाम हुई, हे गाणं आजही अनेकांच्या ओठांवरं आहे. भंडाऱ्यात सध्या अशाच एका मुन्नीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही मुन्नी कुठलं स्त्री पात्र नाही तर, विघ्नेश्वरा हायब्रीड सीड कंपनीचं भात पिकाचं वानं आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीच्या भातपिकासाठी विघ्नेश्वरा हायब्रीड सीड कंपनीचं सुपर मुन्नी बियाणं खरेदी करून लागवड केली. विघ्नेश्वरा हायब्रीड कंपनी आणि त्याचं उत्पादन विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांनीही 145 दिवसात हे पीक हातात येणारं असल्याची बतावणी शेतकऱ्यांना केली. मात्र, आता 180 दिवस लोटूनही लोंबी भरली नाही. त्यामुळं विघ्नेश्वरा हायब्रीड सीड कंपनीनं शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून होत असून याची तक्रार कृषी विभागाला करण्यात आली आहे.
कंपनी विरोधात कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी
यापूर्वी दफ्तरी कंपनीचं 1008 बियाणं बोगस आढळून आलं होतं. यामुळं आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत महेंद्र गभने या युवा शेतकऱ्यानं विघ्नेश्वर सीड बियाणे कंपनीच्या क्षेत्र व्यवस्थापकला अनेकदा संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं त्यांनी आता कृषी अधिकारी कार्यालयात याची तक्रार केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या