Devenra Fadnavis In Nagpur: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'
Devenra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्या 15 डिसेंबरला प्रथमच नागपुरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
Devenra Fadnavis In Nagpur : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अखेर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्या म्हणजेच 15 डिसेंबरला प्रथमच नागपुरात येत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या स्वागतासाठी नागपुरातील त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस याच त्रिकोणी पार्कचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे.
स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'
राज्याचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीसांचे आगमन आमच्यासाठी देव दिवाळी असल्याचे इथल्या स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आगमनाच्या दिवशी संपूर्ण परिसरामध्ये रांगोळ्या टाकून, प्रत्येक घरी दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्याचे इथल्या नागरिकांनी ठरविले आहे. देवेंद्र फडणवीसांचे जेव्हा त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी आगमन होईल त्यावेळी त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सर्वत्र रोषणाई दिसावी, म्हणून परिसरातील प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे उद्याला पहिल्यांदा नागपूरमध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल.
शपथविधी सोहळ्याची राजभवनात तयारीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्येही पाऊण तास चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली होती . या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे . पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे . यंदा आमदारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले असून डिजिटल आसन व्यवस्था करण्यात आली आहे .
हे ही वाचा