Bhandara Crime News : लाचप्रकरणी महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरणासाठी मागितली 15 हजारांची लाच
Bhandara Crime News : रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरणासाठी लाच मागणे एका महसूल सहाय्यकाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी भंडारा एसीबीच्या पथकाने कारवाई करत या महसूल सहाय्यकाला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ अटक केली.
Bhandara News : भंडारा : रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरणासाठी लाच मागणे एका महसूल सहाय्यकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी भंडारा एसीबीच्या (Anti Corruption Bureau) पथकाने कारवाई करत या महसूल सहाय्यकाला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ अटक (Bhandara Crime) केली आहे. उमेश्वर विठ्ठल गणवीर (वय 40) असे या लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव असून त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज बुधवारी 20 मार्चच्या दुपारी 1 वाजताच्या सुमारास भंडारा (Bhandara News) जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या महसूल कॅन्टीनमध्ये (Bhandara Crime News) उघडकीस आली आहे.
रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरणासाठी15 हजारांची केली मागणी
या प्रकरणातील तक्रारदार हे तुमसर येथील रहिवासी असून त्यांच्याकडे 32 बोर रिव्हॉल्वर (Bhandara Crime News) आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून त्यांनी त्यांचा परवाना नूतनीकरण केलेला नव्हता. त्यामुळे 2021 पासून त्यांना शस्त्राचा परवाना नूतनीकरण कारायचे असल्याने त्यांनी आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील दंड-2 शाखेतील महसूल सहायक विभागात संपर्क साधला. त्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि शुल्क शासनाकडे जमा केले आहेत. मात्र, उमेश्वर गणवीर यांनी प्रकरणातील तक्रारदार यांना 20 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्यांच्यात या रकमेवरुण भावबाजी झाली आणि अखेर मोठ्या तडजोडीनंतर 15 हजार रुपये देण्याबाबत ठरले.
लाचप्रकरणी महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि सर्व नियम पाळून देखील पैसे देणे, ही बाब तक्रारदारांना पटण्यासारखी नसल्याने त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणण्याचे ठरवेल. त्यानंतर त्यांनी उमेश्वरला थोड्यावेळात पैसे आणून देतो, असं सांगून तेथून काढता पाय घेतला आणि त्यानंतर या प्रकरणाची माहिती भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांना देत तक्रार दाखल केली. त्यानुसार आज महसूल कॅन्टीनजवळ सापळा रचून लाच स्वीकारताना उमेश्वर गणवीर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
याप्रकरणी भंडारा पोलिसात (Bhandara Crime News) गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, पोलीस कर्मचारी राजकुमार लेंडे, अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, नरेंद्र लाखडे, शिलपेंद्र मेश्राम, विष्णू वरठी, विवेक रणदिवे, अभिलाषा गजभिये, राहुल राऊत आदींनी केलीय.
महत्वाच्या इतर बातम्या