विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय?
Bengaluru Murder Case: बंगळुरूमध्ये एका घरात फ्रिजमध्ये महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.
![विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय? Bengaluru Murder Crime Case murder mystery woman dead body found blood spatters fridge stuffed with maggot infested body parts विखुरलेलं सामान, सगळीकडे रक्ताचे डाग अन् फ्रिजमध्ये कुजलेला मृतदेह; घराचा दरवाजा उघडताच आई हादरली, नेमकं घडलं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/23/2fbc903642d35cbaec5a6cce12829c65172705678023188_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bengaluru Murder Crime: नवी दिल्ली : बंगळुरूमध्ये (Bengaluru Crime) घडलेला प्रकार ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तुमचंही मन सुन्न होईल. 21 सप्टेंबर रोजी शनिवारी, बंगळुरूच्या सेंट्रल भागात 29 वर्षीय महिलेची निघृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना घरात विखुरलेल्या अवस्थेत तिच्या शरीराचे तुकडे आढळले. महिलेच्या शरीराची विटंबना केली होती. तिचे कपडे, शूज, पिशव्या, सुटकेस, रक्ताचे डाग आणि दुर्गंधीनं भरलेल्या फ्रिजमध्ये किडे पडलेलं शरीर आढळून आलं. संपूर्ण घरभर उग्र वास पसरला होता. महिलेच्या कुटुंबीयांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा हे काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य त्यांच्या समोर होतं.
बंगळुरूमध्ये राहत्या घरात हत्या झालेल्या महिलेचं नाव महालक्ष्मी असं होतं. मृत महिलेची आई मीना राणा (58 वर्ष) यांनी घराचं कुलूप उघडलं आणि आपल्या पोटच्या मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर होतं. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मीना आपली मोठी मुलगी लक्ष्मीसोबत महालक्ष्मीच्या घरी पोहोचल्या होत्या. पाईपलाईन रोडजवळील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महालक्ष्मी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून एकटीच राहत होती.
फ्रीजमध्ये आपल्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहून आई हादरली
लग्नाच्या चार वर्षांनंतर महालक्ष्मी पती हेमंत दासपासून विभक्त झाली होती. दोघांना एक मुलगीही होती, ती वडिलांसोबत नेलमंगला इथे राहत होती. बरेच दिवस मुलीची गाठभेट न झाल्यामुळे आई मीना आणि लहान बहिण लक्ष्मी महालक्ष्मीला भेटण्यासाठी बंगळुरूला आल्या होत्या. त्यांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला. घरात प्रचंड उग्र वास येत होता. त्यानंतर त्यांनी काळ्या रंगाचा फ्रीज उघडला आणि दोघींच्या पायाखालची जमीन सरकली. आतील हादरवणारं दृश्य पाहून दोघींना धक्का बसला. फ्रीजमध्ये महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे दोघींना समोर दिसत होते. मृतदेह अक्षरशः कुजला होता.
संपूर्ण फ्रिज रक्तानं माखला होता. आतमध्ये माझ्या मुलीचा कुजलेला, कीडे लागलेला मृतदेह असल्याचं आईनं पोलिसांना सांगितलं. सर्व प्रकार पाहून मृत महालक्ष्मीची आई आणि लहान बहिण भेदरली होती. दोघीही घराबाहेर धावल्या आणि त्यांनी जावई इम्रानला तात्काळ घडल्या प्रकाराबाबत सांगितलं. तात्काळ पोलिसांना देखील घडल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.
मीना राणा आणि त्यांचे पती चरणसिंह राणा हे काठमांडू, नेपाळजवळील एका गावातील रहिवासी आहेत. 35 वर्षांपूर्वी ते कामाच्या शोधात नेलमंगला, बंगळुरू येथे स्थायिक झाले. त्यांना चार मुले आहेत - लक्ष्मी, महालक्ष्मी, हुकुम सिंह आणि नरेश. काही मुलं त्यांची लग्न झाल्यानंतर वेगळी राहू लागली, तर मीना आणि चरण त्यांचा धाकटा मुलगा नरेशसोबत राहत होते.
घरात सातत्यानं उडणाऱ्या खटक्यांमुळे पतीपासून विभक्त
मृत महालक्ष्मीची आई मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी आणि हेमंत दास यांच्यात चार वर्षांपासून घरगुती वाद होते, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. हेमंत नेलमंगला इथे मोबाईल फोन ॲक्सेसरीजचं दुकान चालवतो आणि तिथे तो आपल्या मुलीसह राहत होता, तर महालक्ष्मीनं ऑक्टोबर 2023 मध्ये पाईपलाईन रोडवर वेगळं घर घेतलं होतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)