एक्स्प्लोर

Bengaluru Crime : गर्ल्स पीजीमध्ये रात्री घुसला, त्यानंतर गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीलाच संपवलं; भोपाळमधून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bengaluru Crime : पोलिसांनी फरार आरोपीला मध्य प्रदेशातील भोपाळमधून अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

Bengaluru Crime : नवी दिल्ली : बंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगलामधील एका पीजीमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका 24 वर्षीय तरुणीवर एका आरोपीनं पीजीमध्ये घुसून सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. पीजीमध्ये राहणाऱ्या आणि मुळची बिहारची असणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला शनिवारी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. अभिषेक असं आरोपीचं नाव असून त्यानं 23 जुलैच्या रात्री कृती कुमारीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्यानं मध्य प्रदेशात पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीच्या ओळखीचाच होता. 

पोलिसांनी फरार आरोपीला मध्य प्रदेशातील भोपाळमधून अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. एका खासगी कंपनीत काम करणारी 24 वर्षीय तरुणी हल्लेखोराच्या मैत्रिणीची सहकारी होती. तरुणी हल्लेखोराला आधीपासूनच ओळखत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता व्हीआर लेआऊटमध्ये असलेल्या पीजीमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या खोलीतून तिला बाहेर खेचून चाकूनं तिचा गळा चिरला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

दक्षिण पूर्व पोलीस उपायुक्त कार्यालय आणि कोरमंगला पोलीस स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंकटरेड्डी लेआऊटमध्ये असलेल्या भार्गवी स्टेइंग होम्स फॉर लेडीजमध्ये ही घटना घडली. तरुणी आणि आरोपी एकमेकांना आधापासूनच ओळखत होते. महिलेची मैत्रिण आरोपीची एक्स गर्लफ्रेंड होती. पण काही कारणानं त्यांच्या नात्यात तडा पडला आणि त्यामुळे दोघे वेगळे झाले. त्याच रागातून आरोपीनं हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याला प्रेयसीची हत्या करायची होती, पण त्यानं चुकून तिच्या मैत्रिणीला मारल्याचंही बोललं जात आहे. 

केस धरून तिला फरफटलं, त्यानंतर पीजीमध्ये घुसून सपासप वार 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं सीसीटीव्ही फुटेज अस्वस्थ करणारं आहे. व्हिडीओमधील तरुणीच्या हत्येचा थरार अंगावर शहारे आणणारा आहे. व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी हातात कसली तरी, बॅग हातात घेऊन महिलेच्या खोलीच्या दिशेनं पोहोचतो आणि नंतर दरवाजा ठोठावतो. फुटेजमध्ये दरवाजा दिसत नाही, पण काही सेकंदांनी तरुणी दरवाजा उघडते आणि आरोपी तिला बाहेर खेचतो. त्यानंतर आरोपी आणि तरुणीमध्ये झटपाट होत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. तेवढ्या झटापटीतच आरोपी तरुणीवर सपासप वार करायला सुरुवात करतो. काही मिनिटांपर्यंत आरोपी वार करत राहतो, त्यानंतर तरुणीला तिथेच सोडून तिथून पळ काढलो. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात तशीच बसून राहते आणि मदतीसाठी आरडाओरडा करत असते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

केस पकडून फरफटलं, चाकूनं सपासप केले वार; PG मध्ये घुसून तरुणीवर जीवघेणा हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
Chhagan Bhujbal : गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Telangana Rain : तेलंगणामध्ये पावसाचा कहर; 29 जणांचा जीव गेला,रेवंथ रेड्डींनी बोलावली आढावा बैठकSalman Khan Ganpati Bappa : सलमान खानच्या घरच्या बाप्पाचं आज विसर्जनABP Majha Headlines :  8  AM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सDagdusheth Halwai Ganpati : पुण्यात हजारो महिलांनी एकत्र येत केलं अथर्वशीर्ष पठण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्धाधिशांचं शहर म्हणून जगात नावलौकीक, चीनची राजधानी बीजिंगला टाकलं मागे
Chhagan Bhujbal : गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, भुजबळांचं बाप्पाला साकडं
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Embed widget