Beed Crime: धक्कादायक! बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, तर दुसऱ्याला बेड्या
Beed Crime News : बीड शहरातील शाहू नगर भागातून एक अतिशय खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.

Beed Crime News : बीड शहरातील शाहू नगर भागातून एक अतिशय खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह लावण्याचा संतापजनक (Crime News) प्रकार समोर आलाय. या घटनेत पहिल्या नवरदेवाने पळ काढला आहे, तर दुसरा नवरदेवाला पोलिसांनी (Beed Crime) ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत, पण पहिल्या पत्नीला माहिती मिळाली, अन्..
पुढे आलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला देखील, मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. त्यामुळे त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परभणीच्या पाथरीत दिवसाचं घरफोडी, 16 लाखांचा ऐवज केला लंपास
परभणीच्या पाथरी तालुक्यातील माळीवाडा भागात राहणारे मानोलीकर कुटुंब अंत्यविधीसाठी गेल्याची माहिती मिळताच चोरट्यांनी भर दिवसाच त्यांचे घर फोडून १५ लाखांच्या दागिन्यांसह एक लाख रोख असा 16 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान दिवसाच घडलेल्या या घटनेने पाथरीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाथरीतील माळीवाडा येथील साहेबराव मनोलीकर यांची सासरवाडी ही माळीवाड्यातच आहे.त्यांच्या सासूबाईंचे आज निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या त्यांच्या सासरवाडीत गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून मोठ्या प्रमाणात दागिने ज्यांची किंमत जवळपास 15 लाख आणि रोख 1 लाख रक्कम लंपास केली.अशी मागणी साहेबराव मनोलीकर यांनी दिली घटनेची माहिती समजताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून,तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी डॉगस्कॉड ला पाचारण केले असुन पुढील तपास कसोशीने केला जात आहे.
आणखी वाचा
एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; नेमकं काय घडलं?, A टू Z समजणार!























