एक्स्प्लोर

Badlapur School: अक्षय शिंदेला ओळख परेडसाठी मुलींसमोर आणणार? मुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस आयुक्तांना बोलावून घेतलं

Badlapur Crime case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक. अक्षय शिंदे याला ओळख परेडसाठी मुलींसमोर आणले जाण्याची शक्यता. एसआयटी पथकाच्या तपासाला वेग

ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने न्यायालयाकडे तसा अर्ज केला आहे. आता त्याची परवानगी मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या ओळख परेडची परवानगी दिल्यास दंडाधिकाऱ्यांसमोर शाळेतील दोन्ही मुलींना आणण्यात येईल. या ओळख परेडवेळी मुलींनी अक्षय शिंदेला ओळखल्यास तो न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

दरम्यान, अक्षय शिंदे याला सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण कोर्टाने त्याला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अक्षय शिंदे याच्याविरोधात आरोपपत्रात पॉस्को अंतर्गत कलम 21 आणि 6 वाढवण्यात आले असून कलम 6 मध्ये आरोपीला 10 ते 20 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना बोलावून घेतले

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल.

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा अहवाल सादर

बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. तर पोलिसांच्या एसआयटी पथकाकडून आरोपी अक्षय शिंदे याच्या दोन पत्नींची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बदलापूर घटनेतील पॉस्को दाखल  गुन्ह्यात पॉस्को मधील २१  कलम वाढवण्यात आले आहे. शाळेत घडलेली घटना ज्या शिक्षकांनी लपवली त्यांनी पोलिसांना कळवली नाही अशा सगळ्या दोषी शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यात नेमके कोण शिक्षक आहेत शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी कोण आहेत याची चौकशी सुरु आहे. बदलापूर शाळेत घडलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षिकांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असल्याचे समजते.

आणखी वाचा

शितोळे मॅडमचा आमच्या मुलीवर विश्वास नव्हता, रात्री साडेबाराला आम्हाला मेडिकल टेस्टला नेलं; बदलापूरच्या मुलीच्या पालकांची आपबीती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget