एक्स्प्लोर

Badlapur School case Exclusive: शितोळे मॅडमचा आमच्या मुलीवर विश्वास नव्हता, रात्री साडेबाराला आम्हाला मेडिकल टेस्टला नेलं; बदलापूरच्या मुलीच्या पालकांची आपबीती

Badlapur School: मुलीच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेऊन पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या पालकांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर 12 तासांनी मेडिकलला नेलं, पालकांचा दावा

बदलापूर: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यानंतर पोलीस प्रशासनाचा कुर्मगतीने आणि संशयास्पद कारभार सध्या टीकेचा विषय ठरत आहे. राज्य सरकारने आता यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून आरोपीला कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यापूर्वी पोलीस मुलीच्या आई-वडिलांशी कसे वागले, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात कशी दिरंगाई झाली, याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. 

साधारण 14 ऑगस्टला हा सगळा प्रकार मुलीच्या आईवडिलांच्या लक्षात आला. शाळेतील एका दुसर्‍या मुलीसोबतही तसाच प्रकार घडल्याचे त्यांना समजते. मात्र, शाळेकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, त्यासाठी चिमुरडी मुलगी आणि तिच्या पालकांना अनेक तास पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागले.

13 ऑगस्टला नेमकं काय घडलं?

मुलीच्या आईने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, माझ्या मुलीबरोबरची शाळेतील मैत्रीण आहे. तिच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. पण तिला ताप आल्याचे कारण देत ती शाळेत येत नव्हती. 13 तारखेला ती शाळेत गेली नव्हती. माझी मुलगी त्यादिवशी शाळेत गेली होती. शाळा सुरु झाल्यावर मला काहीवेळाने शिक्षकांचा फोन आला. तुमची मुलगी खूप रडतेय, काही केल्या ती रडायची थांबत नाही. तुम्ही तिला शाळेत घ्यायला या, असे शिक्षकांनी मला सांगितले. तेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करुन तिला शाळेत जायला सांगितले. मला परत मॅडमचा फोन आला, ती रडायची थांबत नाही. कान दुखतोय, असे सांगतेय. तोपर्यंत माझे वडील शाळेत पोहोचले. त्यांच्याबरोबर माझी मुलगी वर्गातून बाहेर पडली. ती माझ्या वडिलांचा हात धरून चालत होती. तिची पावलं वाकडीतिकडी पडत होती. ती शाळेत होताना व्यवस्थित होती, पण आता वाकडीतिकडी चालते, हे माझ्या वडिलांच्या लक्षात आले. तिला घरी गेल्यावर ताप आला. 14 तारखेला आम्ही तिला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वडिलांनी माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. 

तेव्हा माझ्या पतींना शंका आली. ते आमच्या मुलीला घेऊन 15 तारखेला डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टची तपासणी करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. घरी आल्यावर आम्ही मुलीला विचारलं तेव्हा शाळेतला दादा, गुदगुदल्या करतो, असे तिने सांगितले. आम्ही दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क केला. त्यांनी माझी मुलगी रात्री बडबडते, झोपेत हातवारे करते, असे सांगितली. आम्ही आपण पोलिसांत जाऊ, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. तेव्हा दुसऱ्या मुलीच्या पालकांनी सांगितले की, मी शाळेत गेलो होतो, मात्र त्यांनी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. एवढी मोठी शाळा आहे, आपण त्यांचं काय वाकडं करणार, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आम्ही मनसेच्या स्थानिक नेत्यांकडे गेलो. त्यांच्याशी बोलल्यानंतर 16 तारखेला आम्ही पोलीस ठाण्यात गेल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले. 

पोलीस ठाण्यात काय घडलं?

आम्ही 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचलो. आम्हाला शाळेविरुद्ध तक्रार करायची आहे, असे सांगितले. मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तेथील पोलीस अधिकारी शितोळे मॅडमने माझ्या मुलीची चौकशी करायला सुरुवात केली. तुझं नाव काय, तू कुठे राहते, हे विचारलं. मात्र, त्यानंतर माझी मुलगी गप्प बसली. त्यांच्या पोलिसी गणवेशाला घाबरुन ती काही बोलत नव्हती. अखेर शितोळे मॅडम साधे कपडे घालून आल्या. त्यावेळी माझ्या मुलीने त्यांना शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मी शाळेच्या स्वच्छतागृहात जाते, तिकडे एक दादा असतो. तो गुदगुदल्या करतो. त्याने मला मारलंदेखील होतं. तिने सगळा प्रकार सांगितला. ज्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, त्यांचं नाव तिला माहिती नव्हते. ती त्याला काठीवाला दादा म्हणून ओळखायची. त्याने एकदा मला कानाखालीही मारली होती, असे मुलीने सांगितले. आम्ही पोलिसांना खासगी रुग्णालयातील मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा रिपोर्ट पोलिसांना दाखवला. 

मात्र, पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्यांनी शाळेच्या मुख्याधापकांना फोन केला. त्यानंतर शितोळ मॅडम म्हणाल्या की, मुलीच्या प्रायव्हेट पार्टला सायकल चालवल्यामुळे इजा झाली असेल. शाळेतून तसे सांगितले जात आहे. शितोळे मॅडमनी आमच्याकडील मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवला नाही. त्या माझ्या मुलीच्या सांगण्यावरही विश्वास ठेवत नव्हत्या. आमच्याकडे सायकलच नव्हती तर मुलीला त्यामुळे इजा कशी होणार? हे सगळं रात्री ९ वाजेपर्यंत सुरु होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करु घेतला, असे मुलीच्या आईने सांगितले.

मेडिकल टेस्टवेळी काय-काय घडलं?

तब्बल 9 तासांनी गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर रात्री साडेबाराला शितोळे मॅडमनी आपल्याला मेडिकल चाचणीसाठी रुग्णालयात जायचे आहे, असे सांगितले. आम्ही बदलापूर ग्रामीण रुग्णालयात गेलो. तिकडे मेडिकलची सुविधा नव्हती. मग आम्ही पावणेदोनला पुन्हा पोलीस ठाण्यात आलो. त्यानंतर शितोळे मॅडमनी आम्हाला उल्हासनगरच्या रुग्णालयात नेले. तिकडे पेपरवर्क होईपर्यंत आम्ही चार वाजेपर्यंत बसून होतो. त्यांनी मुलीसोबत काय घडलं, हे माझ्याकडून विचारून घेतलं. मुलीला प्रश्न विचारले, पण ती काही बोलली नाही, असे मुलीच्या पालकांनी सांगितले.

शाळा प्रशासनाची मुजोरी

मुलीचे पालक या सगळ्यानंतर शाळेत गेले तेव्हा मुख्याधापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही. आम्ही शाळेत पुरुष कामाला ठेवलेच नाहीत. पण आम्ही शाळेत गेलो होतो तेव्हा तिकडे पुरुष दिसत होते. 10-15 मिनिटांनी त्यांनी विषय बदलला. आमच्या शाळेतील सीसीटीव्ही सुरु आहेत, पण रेकॉर्डिंग होत नाही, असे शाळेतून सांगण्यात आल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली. 

आम्ही प्रचंड मानसिक तणावात, मुलगी रात्री झोपेतून दचकून उठते, मुलीच्या वडिलांनी सांगितली आपबिती

पिडित मुलीच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आमच्यावर इतकं मेंटल प्रेशर आहे, आम्ही आमच्या मुलीला ते दाखवू शकत नाही. यातून तिला जमेल तितकं आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. ती झोपते, काही वेळा झोपेतून दचकून जागी होते.मला या शाळेत जायचं नाही, मला दुसऱ्या शाळेत जायचं म्हणते.

आमची मुलगी व्यवस्थित राहिली पाहिजे, इतकीच आमची अपेक्षा आहे. आदर्श विद्यामंदिर शाळेतील सर्व मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे. मी राज ठाकरेंचा आभारी आहे, त्यांनी आम्हाला खूप मदत केल्याचेही मुलीच्या पालकांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati : तब्बल 180 महिलांचं लैंगिक शोषण, 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ? अमरावतीत रॅकेटचा पर्दाफाश
तब्बल 180 महिलांचं लैंगिक शोषण, 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ? अमरावतीत रॅकेटचा पर्दाफाश
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget