एक्स्प्लोर

Crime : लग्नाचं आमिष दाखवत प्रेयसीवर अत्याचार, पीडित तरुणीने केलं विषप्राशन

crime News : बदलापूर पोलिसांनी आरोपी महेंद्र भोईर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Badlapur Latest crime News : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने अनेक वेळा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रियकरानं लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापूर (Badlapur ) पूर्व पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Badlapur Latest crime News)

महेंद्र वसंत भोईर असं पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. 2018 पासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. एप्रिल 2022 रोजी प्रियकराने स्वतःच्या कारमध्ये बसवून पीडितेला फिरण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेलं. त्यानंतर तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित भयभीत होऊन रडत असतानाच प्रियकराने तिची समजूत काढत लग्नाचे आमिष दाखवून वेळ मारून नेली. त्यानंतर पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून मे 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यत वारंवार तिच्यावर अत्याचार केले. मात्र त्यानंतर आरोपी महेंद्र याने पीडितेशी बोलणे बंद करून तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. त्यामुळे व्यथित झालेल्या पीडित तरुणीने गुगलवर विषविक्री करणाऱ्या कंपनीचे नाव सर्च करून त्या कंपनीकडून ऑनलाईन 50 ग्राम विषारी औषध मागवलं. ते विष ती पर्समध्येच घेऊन फिरायची.

दरम्यान 24 सप्टेंबर रोजी पुन्हा आरोपी महेंद्र याने कारमध्ये बळजबरीने पीडितेवर अत्याचार  केला. त्याच वेळी पीडितेने पर्समध्ये असलेले विष कारमध्येच प्राशन केले. घाबरलेल्या आरोपी महेंद्र याने पीडितेला तातडीने कारमधून घरी  सोडले. अखेर तरुणीची प्रकृती खालावतच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बदलापूर पोलिसांनी आरोपी महेंद्र भोईर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

 संबधित बातम्या :
Ankita Murder Case : 'रिसार्टमध्ये सुरु होती देहविक्री अन् अंमली पदार्थांचे अवैध धंदे'; हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याचा दावा
Nashik Crime : घातपाताचा संशय असताना अपघाताची नोंद, तर दोन आठवडे उलटूनही व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा नाही; पोलिसांच्या तपासावर नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget