एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik News: अरे तू काय केलं, ती महिला प्रेग्नंट झाली...; अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन, पुढे काय घडलं?

Ashok Kharat Case Nashik News: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला आहे.

Ashok Kharat Case Nashik News: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय. आज अशोक खरातला  दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आज न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. याचदरम्यान, एक महत्वाची बातमी समोर आली आहे. (Ashok kharat Case Nashik Crime News) 

ती महिला प्रेग्नंट झाली, तु हे काय केलं? (Ashok Kharat Case Nashik)

अशोक खरात पहिले महिलांचे लैंगिक शोषण करुन नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता. यावेळी एका प्रकरणात एक महिला आणि बड्या उद्योगपतींमध्ये शारीरिक संबंध झाले. यानंतर अशोक खरातने संबंधित बड्या उद्योगपतीला फोन केला आणि तू ज्या महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले, ती महिला प्रेग्नंट राहिली. तु हे काय केलं?, आता हे प्रकरण मिटवायला लागेल, असं सांगितले. मात्र संबंधित महिला प्रेग्नंट नव्हती. अशोक खरातने खोटं सांगून बड्या उद्योगपतीकडून टप्प्याटप्याने 20 कोटी रुपये लाटले. याबाबत महिलेला कोणतीही कल्पना दिली नाही, अशी माहितीही समोर आली आहे. 

व्हिडीओ व्हायरल झाल्याची खरातला लागली कुणकुण- (Ashok Kharat Viral Video)

भोंदूबाबा अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागली होती. या प्रकरणातील पीडितांनी खरातवर कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती. मात्र पीडितांच्या हाती निराशा पडली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर त्याला वाचा फुटली. व्हिडीओ दाखवत पीडित कुटुंबानं आमदाराला आपबीही सांगितली. मात्र संबंधित आमदारानं या प्रकराला वाचा फोडण्याऐवजी उलट खरातलाच तक्रारीविषयी माहिती दिली. त्यामुळे प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातनं पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. मात्र पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि संबंधित आमदारानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि त्यानंतर या सर्व अत्याचारकांडांला वाचा फुटली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

अशोक खरातच्या त्या व्हिडिओची कुणकुण कशी लागली?, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget