एक्स्प्लोर

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई यांनी चिखली येथील राहत्या घरी स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. सतत विविध आंदोलनांच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठवणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (Peoples Republican Party) जिल्हाध्यक्ष विजय पंढरीनाथ गवई (वय 48) यांनी चिखली येथील राहत्या घरी गळफास लावून घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Buldhana Crime News: राहत्या घरी उचलले टोकाचे पाऊल

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखली येथील आपल्या राहत्या घरात विजय गवई यांनी टोकाचे पाऊल उचलले. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Buldhana Crime News: टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

विजय गवई हे आक्रमक नेतृत्व आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अचानक असे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. विजय गवई यांच्या अशा अकस्मात आणि दुर्दैवी जाण्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे चिखली शहरासह परिसरात शोककळा पसरली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.  

Buldhana Crime News: 2 कोटींना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बुलढाणा पोलिसांकडून पर्दाफाश

दरम्यान, बुलढाणा सायबर पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई करत नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 2 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी जोधपूर राजस्थान येथील शुभम नांगल, धनराज उर्फ रॉबीन विष्णोई आणि अहिल्यानगर येथील मुनाफ शेख या तीन आरोपींना मुंबईतील ठाणे परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी आरोपींकडून एकूण 52 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल गोठवला आहे. या तपासाचे मुख्य धागेदोरे राजस्थानमध्ये जुळल्याचे निष्पन्न होत असून, पीडित वृद्धाचे 2 कोटी रुपये परत मिळवून देण्यासाठी बुलढाणा सायबर पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : शेतीच्या वादात पुतण्यानं संतापाचं टोक गाठलं; काका-काकूंचेच अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपीची गावातून काढली धिंड
शेतीच्या वादात पुतण्यानं संतापाचं टोक गाठलं; काका-काकूंचेच अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपीची गावातून काढली धिंड, छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण चर्चेत!
Laxman Hake: मोठी बातमी! सोलापुरात लक्ष्मण हाकेंसोबत अज्ञात तरुणांची झटापट झाल्याचा आरोप; मोहोळमध्ये गुन्हा दाखल, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी! सोलापुरात लक्ष्मण हाकेंसोबत अज्ञात तरुणांची झटापट झाल्याचा आरोप; मोहोळमध्ये गुन्हा दाखल, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
Advertisement

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
Embed widget