एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करतच होता. पण अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवत होता.

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटी या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा, अशीही माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करतच होता. पण अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवत होता. याआधारे अशोक खरातने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केले असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडे आहे. अशोक खरात पहिले महिलांचे लैंगिक शोषण करुन नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता, अशी हादरवणारी माहितीही समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार- (Ashok Kharat Marathi News)

अशोक खरात याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून काल 3 महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटी ने दिली आहे. तक्रार करणाऱ्या तिन्ही महिला असून अशोक खरातने त्यांच्यावरही अत्याचार  केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर तक्रारी प्रमाणेच पँटर्न राबवित कुटूंबियांना केबिन च्या बाहेर काढून महिलांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल असून यात 5 महिलांनी  आणि एका  पुरुषाने फिर्याद दिली आहे, आतापर्यंत च्या तपासात काय निष्पन्न झाले याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली जाणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

अशोक खरातची शिर्डीतही कोट्यावधींची मालमत्ता- (Ashok kharat Case)

भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आल्यानंतर आता त्याची काही उद्योग व्यवसायातही भागीदारी असल्याचं आता समोर आलं आहे. शिर्डीतील वॉटरपार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या कोट्यावधीच्या मालमत्तेत हा भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परीसरात असणाऱ्या सिल्वर ओक या लॉन्समध्ये तो भागीदार आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये गुंतवणूक या भोंदूबाबाने केली आहे. शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्याने कशा मिळवल्या याचीही चौकशी होणं गरजेचं आहे.

अशोक खरात आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध उघडकीस- (Ashok kharat Case Nashik Crime News)

भोंदूबाबा अशोक खरात आणि अधिकारी यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशीला सुरवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजीत भोंडे पाटील यांची पत्नी आणि भोंदू बाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटूंबाचे आणि खरात याचे आर्थिक संबंध उघडकीस आणले होते. भोंदूबाबा अशोक खरातसोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक गेल्याची माहिती आहे. आणखी कोण अधिकारी खरात याच्या जागांमध्ये भागीदार आहेत का?, त्याचा देखील तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड झाला आहेत.

अशोक खरातच्या त्या व्हिडिओची कुणकुण कशी लागली?, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget