एक्स्प्लोर

अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्यांना लोकल प्रवासासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देणारा अटकेत; रेल्वे पोलिसांची कारवाई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच 15 जूनपासून लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये म्हणून महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम सुरु केली होती.

मुंबई : रेल्वे पोलिसांनी एका अशा इसमाला अटक केली आहे, जो लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देण्याच सिंडिकेट चालवत होता. इतकच नाही तर त्याने ज्या प्रवाशांना खोटे क्यूआर कोड पास बनवून दिले त्यांना सुद्धा रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खोटे क्यूआर कोड पास बनवल्या प्रकरणी एकूण सहा गुन्ह्यांची नोंद झाली असून हे सर्व क्यूआर कोड अनिस राठोडकडून बनवण्यात आले होते.

वडाळा जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनिस राठोड मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात राहत होता. तिथूनच तो लोकांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड बनवून देत होता. ज्याच्या मोबदल्यात तो त्यांच्याकडून 500 ते 1000 रुपये घेत होता. हे सर्व तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा वडाळा GRP ने वडाळा स्टेशन वरून दोघांना खोटे क्यूआर पास असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं. या दोघांकडून अनिस राठोडच नाव समोर आलं. अनिस कडूनच यांनी क्यूआर कोड बनवून घेतले होते. वडाळा रेल्वे पोलिसांनी अनिस राठोडच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांनी त्याच्याकडून कॉम्प्युटर आणि इतर साहित्य जप्त केरून त्याला अटक केली. ज्या लोकांनी त्याच्याकडून क्यूआर कोड पास बनवून घेतले होते, ते छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे कामगार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच 15 जूनपासून लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये म्हणून महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम सुरु केली होती. आणि याचाच फायदा घेण्यासाठी फेक क्यूआर कोड बनवणारी टोळी सक्रिय झाली. अनिस राठोडने आतापर्यंत 400 ते 500 फेक क्यूआर कोड लोकांना बनवून दिले असल्याची कबुली दिली आहे.

पाहा व्हिडीओ : लोकलने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर मुंबईचे डबेवाले म्हणतात...

रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हे रॅकेट अजून किती दूरपर्यंत पसरलं आहे याचाही शोध घेत आहेत. जेणेकरून या रॅकेटला उध्वस्त केलं जाऊ शकेल. अनिस राठोडवर इतर ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या सर्वांची माहिती घेत आहेत.

अनिसकडून पास बनवणाऱ्यांमध्ये मस्जिद बंदर येथे काम करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं अनिसकडून पोलिसांना सांगण्यात आलं आहे. रेल्वे सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सुरु असल्यामुळे इतर नागरिकांसाठी प्रवास करण्यास मनाई आहे. ज्यामुळे लोकांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. मात्र या प्रवासात लोकांना दिवसाचे 6 ते 7 तास घालवावे लागत आहेत. तर कामावरचे तास वेगळेच. ज्यामुळे वेळ वाचवण्यासाठी लोक खोटे क्यूआर कोड बनवण्यासाठी अनिसच्या संपर्कात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हावळे आणि चव्हाण, पोलीस हवालदार प्रवीण एवळे, सागर रणवारे, पोलीस शिपाई तुषार कवठेकर सागर गायकवाड या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून क्यूआर कोड रॅकेट उध्वस्त करण्यात या पथकाला यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला बेड्या!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget