एक्स्प्लोर

Chandrapur : अवैध दारू विक्रीविरोधात महिला संतप्त; अनेक बॉटल फोडत दारू विक्रेत्याची जाळली झोपडी  

Illegal Liquor in Chandrapur : अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी दारूच्या बॉटल फोडत अवैध दारू (Illegal Liquor) विक्रेत्याची चक्क झोपडी जाळून आपला रोष व्यक्त केला आहे.

चंद्रपूर : अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी दारूच्या बॉटल फोडत अवैध दारू (Illegal Liquor) विक्रेत्याची चक्क झोपडी जाळून आपला रोष व्यक्त केला आहे. चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथे ही घटना घडली आहे. हिवरा हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असून अवैद्य दारूविक्रेत्यांनी एका शेतात तळ ठोकला होता. त्यामुळे नागपूर पोलिस कारवाईसाठी आले की दारुविक्रेता चंद्रपूरच्या सीमेत यायचा आणि चंद्रपूर पोलिस आले तर तो नागपूर जिल्ह्यात पळून जायचा. यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याने हिवरा, साठगाव आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील त्रस्त महिलांनी याविरोधात मोर्चा उघडून त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून तो  पेटवून दिला आहे. 

या घटनेनंतर भिसी व भिवापूर पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून तीन हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेत आरोपी अशोक सगरे आणि स्वामी बुचलवार यांना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. 

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकांची 9 जणांना धडक

ठाण्यातील उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या व्हीनस चौकात भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव कार चालवून 9 जणांना धडक दिलीय. यामध्ये चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा  (हिट अँड रन) गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झालाय. कार चालक व्हीनस चौक परिसरातून कार भरधाव वेगाने घेऊन जात असताना  त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा आणि काही नागरिकांना जोरदार धडक दिली. कारचालक  मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमीने दिलीय. यातील दोघांवर खाजगी तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचुर झालाय. या अपघातात कार चालकासह चार जण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर

Embed widget