एक्स्प्लोर
Advertisement
धक्कादायक! अकोल्यात 65 वर्षीय वर्षीय मुकबधीर वृद्धेवर सामूहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक
Akola Crime : पातूर तालूक्यातील सावरगावात हा घृणास्पद प्रकार घडला असून चान्नी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यात एक घृणास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जणांनी चक्क मुकबधीर असलेल्या एका 65 वर्षीय महिलेला दारु पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे. आता या प्रकरणात चान्नी पोलिसांनी बलात्काराची गुन्हे दाखल करत अत्याचार करणाऱ्या या दोघांनाही गजाआड केलं आहे. या संदर्भात अधिक तपास चान्नी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन करीत आहे.
असा घडला प्रकार
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव मधील मूकबधीर असलेल्या 65 वर्षीय महिलेला 17 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास विनोद लठाड आणि निलेश बोरकर या दोघांनी दुचाकी वाहनावर बसवून नेले. त्यानंतर तिला धमकावून बळजबरीने दारु पाजली अन् तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला रात्री साडे नऊ वाजता सोडून दिले.
अशी उघडकीस आली घटना
दरम्यान, या महिलेला सोमवारी सकाळी असह्य त्रास सुरू झाला. त्यानंतर तिने आपल्यावर घडलेला प्रकार आठवला अन् हा घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. नातेवाइकांनी पीडित महिलेला घेवून चान्नी पोलीस स्टेशन गाठले अन् फिर्याद दाखल केली. यावरून चान्नी पोलिसांनी सावरगाव येथील आरोपी विनोद लठाड व नीलेश बोरकर या दोन जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी या दोघांना अवघ्या दोन तासात अटक केली.
आज या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनवाली. या संदर्भात अधिक तपास उपनिरीक्षक गणेश महाजन, सुधाकर करवते, दत्तात्रय हिंगणे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement