(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola News : प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा अपहरण प्रकरणात 5 जणांना अटक; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Akola Crime News : अकोला (Akola) शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांच्या अपहरण प्रकरणात (Crime) अकोला पोलिसांना मोठं यशं हाती आलंय. तसेच पोलिसांना अपहरण प्रकरणात मोठा खुलासा देखील केलाय.
Akola Crime News अकोला : अकोला शहरातील ख्यातनाम काच बॉटल सप्लायर आणि व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांच्या अपहरण प्रकरणात (Crime News) अकोला पोलिसांना (Akola Police) मोठं यशं हाती आलंय. तसेच पोलिसांना अपहरण प्रकरणात मोठा खुलासा देखील केलाय. यात अपहरण करणाऱ्या पाच व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात मुख्य संशयित आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे याच्यासह 5 लोकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार आणि दोन बनावट देशी कट्टे तसेच चार मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात 1 कोटि रुपयांची डिमांड अपरहरणकर्त्यांकडून झाली होती, अशी माहिती देखील पोलिसांच्या तपासणीतून पुढे आली आहे.
अपहरणकर्त्यांकडून बेदम मारहाण
किशोर दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी दाभाडे, अशिष अरविंद घनबाहादुर, राजा सरफराज खान, चंदु इंगळे या सात लोकांनी व्यासायिक वोरा यांचं अपहरण केल्याच समोर आले. दरम्यान, या प्रकरणातील इतर दोघे जण फरार असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यांकडून अपहरणाच्या रात्री अकोल्यातल्या कायम गजबजलेल्या बाजारात आणि दुसऱ्या दिवशी कान्हेरी भागात एका खोलीत अरुणकुमार वोरा यांना दोरीनं बांधूनं ठेवले होते.
तसेच त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि बंदुकीच्या धाकावर त्यांचं अपहरण झालं होतं. तसेच अपहरणकर्त्यांकडून आपल्याला बेदम मारहाण झाल्याच्या खुलासा देखील वोरा यांनी केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास अकोला पोलीस करत असून उर्वरित फरार व्यक्तींचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांचं नुकतेच अपहरण झाल्याच्या बातमीने (Crime News) अकोल्यात एकच खळबळ उडाली होती. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या (Akola Police) चारजिन कपाउंड परिसरात ही अपहरणाची घटना 13 मे च्या रात्री पावणे 10 वाजताच्या सुमारास घडली होती. अकोल्यातल्या दगडीपुल भागात वोरा याचं रिकाम्या काच बॉटलचं गोदाम आहे. ते गोदाम बंद करून बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली.
त्यानंतर त्यातील 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आले. यादरम्यान त्यांनी 'बचाव-बचाव' म्हणून आरडाओरड देखील केली. मात्र, तोपर्यत उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगानं पळवलं. या घटनेनंतर अकोला शहरासह व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अकोला पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करत पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान केले. अखेर अरुणकुमार वोरा यांच्या शोध घेत पोलिसांनी अपहरणकर्त्यांकडून त्यांची सुखरूप सुटका केली आहे. तसेच या प्रकरणातील व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या