Crime News : एकत्र बसून दारु प्यायले, मग अनैसर्गिक संबंधाची मागणी; विरोध केल्याने हत्या, नगर हादरलं!
Crime News : तरुणावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, जोरजबरदस्तीला विरोध केल्याने दगडाने ठेचून हत्या... अहमदनगरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ahmednagar Crime News : अनैसर्गिक संभोग करण्याचे उद्देशाने तरुणाला दारु पाजून हत्या केल्याची घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. अनैर्सिंक संभोगाला विरोध करताच गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं उघड झालं आहे. दोन आरोपींनी एका तरुणाला दारू पाजली आणि त्यानंतर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणाने याला विरोध करताच आरोपींनी त्याची हत्या केली. दरम्यान, या प्रकरणी आग्रा, उत्तर प्रदेश येथून दोन आरोपींनी ताब्यात घेण्यात आलं असून स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
तरुणावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
अहमदनगरच्या नागापूर येथील सह्याद्री चौकाजवळ दगडाने ठेचून एकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा झाला असून अनैसर्गिक संभोग करू न दिल्याने खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. संदीप शेळके असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून विशाल जगताप आणि साहील पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना आग्रा येथून ताब्यात घेतलं आहे. 23 फेब्रुवारीला आरोपी आणि संदीप शेळके हे सोबत दारू प्यायले होते. दारूच्या नशेत आरोपींना अनैसर्गिक संभोग करण्याची इच्छा तयार झाली, त्यांनी संदीप शेळके यांना एमआयडीसी परिसरातील निर्जनस्थळी नेले. संदीप शेळके यांनी हे कृत्य करण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केली असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.
जोरजबरदस्तीला विरोध केल्याने दगडाने ठेचून हत्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची नावे विशाल चिंतामण जगताप, वय 22, आणि साहील शेरखान पठाण, वय 20 वर्षे अशी आहेत. चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्हाची कबुली दिली आहे. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मयत संदीप शेळके याला अनैर्सिंक संभोग करण्याचे उद्देशाने जास्त दारु पाजून, एमआयडीसी, अहमदनगर येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीचे पडके इमारतीत नेले. आरोपींनी जोरजबरदस्तीने मयताचे कपडे काढण्याचा आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मयताने विरोध करताच आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने गळा आवळुन आणि दगडाने डोके आणि चेहरा ठेचुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोपींनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :