Pune Crime News : मोठी बातमी : अल्पवयीन मित्राला संपवून व्हिडीओ स्टेटस ठेवला, क्रूर कृत्याने पुणे पुन्हा हादरलं!
Pune Crime News: पुण्यातील चाकणमध्ये अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केली आहे दगडाने ठेचत हत्या करतानाचा त्यांनी व्हिडीओ ही बनवला आणि तो इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ही ठेवला आहे.
चाकण, पुणे : पुण्यातील चाकणमध्ये (Pune Crime News)अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दगडाने ठेचत हत्या करतानाचा त्यांनी व्हिडीओ ही बनवला आणि तो इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ही ठेवला आहे. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना सोमवारच्या रात्री घडली.
शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतलेलं आहे. मृत मुलगा, मुख्य आरोपी अन तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलात आणि तिसऱ्या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत मुलाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृतकाला दगडाने ठेवले.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
या हत्येचा व्हिडीओ त्या दोघांनी बनवला, यात मुख्य आरोपी मृतकाच्या डोक्यात दगड घालताना दिसत असून, तो व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टेट्सवर ठेवण्यात आल्याचं ही समोर आलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याआधारे चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे.