एक्स्प्लोर

Ahmednagar : मुलींच्या अंगात सैतान असल्याचं सांगत अत्याचार, अहमदनगर जिल्ह्यातील चर्चमधील धक्कादायक प्रकार

Ahmednagar Crime : गरिबीचा फायदा घेऊन केल्या जात असलेल्या धर्मांतराचं मोठं रॅकेट जिल्ह्यात असण्याची शक्यता असून धर्मांतर विरोधी कायदा केला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.

सोलापूर : गरिबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रयत्न सुरू असल्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar Crime) घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींच्या अंगात सैतान आहे, तो काढावा लागेल असं सांगत त्यांना धर्मस्थळी बोलावून गेल्या एक महिन्यापासून अत्याचार केला जात असल्याची खळबळजनक घटना सोनई गावाजवळ घडली आहे. पाचवीत शिकणाऱ्या मुलींना अत्याचाराची वाच्यता जर केली तर त्यांची आई आणि आजी मरून जाईल अशी भीती घालण्यात आली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे.

मुलींच्या अंगात सैतान असल्याचं सांगत चर्चमध्ये घेतलं

अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरला आहे. उंबरे, श्रीरामपूर, कोपरगाव पाठोपाठ आता नेवासा तालुक्यातील सोनई येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. सोनई गावाजवळील चर्चच्या पास्टरने गरीब कुटुंबाच्या असहाय्यतेचा फायदा घेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. तुमच्या कुटुंबातील मुलींमध्ये असलेल्या सैतानामुळे संकट आले आहे. त्यामुळे त्यांना धार्मिकस्थळी पाठवा असं सांगण्यात आलं.  गेल्या एका महिन्यापासून अगदी पाचवीत शिकणाऱ्या 10 वर्षीय दोन मुलींवर भीती दाखवत अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. 

हा प्रकार उघडकीस आल्याने सोनई परीसरात खळबळ उडाली आहे. गरिबीचा फायदा घेऊन केल्या जात असलेल्या धर्मांतराचं मोठं रॅकेट जिल्ह्यात असण्याची शक्यता असून धर्मांतर विरोधी कायदा केला जावा आणि या प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करावी ही मागणी श्रीराम संघाने केली आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल 

अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम वैरागर, संजय वैरागर आणी सुनील गंगावणे या तिघांच्या विरोधात सोनई पोलीस पोलीस ठाण्यात भादवी कलम 376,354,34 यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना जेरबंद करण्यात आलं आहे. ही घटना अतिशय गंभीर असून आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आहे. या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलीस करत आहेत.

हे प्रकरण अतीशय गंभीर असून पोलिसांनी याची पाळेमुळे खोदून काढण्याची गरज आहे. अशा पद्धतीने गरीबीचा फायदा उचलून अल्पवयीन मुलींचे शोषण होत असल्याने कठोर कारवाईची गरज आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget