एक्स्प्लोर

कृषी पूरक साहित्य घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, फसवणूक झाल्याचे समाजकल्याण विभागाकडून मान्य; दडवून ठेवलेला अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती

Nagpur News : जिल्हा खनिज निधीतील कृषी पूरक साहित्य घोटाळा (Scam) प्रकरणात महिला बचत गटांची समाजकल्याण विभागाच्याच अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचे स्वतः समाजकल्याणच्या चौकशी अहवालात मान्य केले आहे.

Nagpur News : जिल्हा खनिज निधीतील कृषी पूरक साहित्य घोटाळा (Scam) प्रकरणात महिला बचत गटांची समाजकल्याण विभागाच्याच अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचे स्वतः समाजकल्याणच्या चौकशी अहवालात मान्य केले आहे. जानेवरी 2024 मध्ये तयार झालेल्या या चौकशी अहवालनंतर कारवाई होण्याच्या भीतीपोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा चौकशी अहवाल दाबून ठेवला आहे. मात्र समाजकल्याण विभागाचा हाच सहा सदस्यांच्या चौकशी समितीचा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. यात महिला बचत गटाची फसवणूक झाल्याचे स्वतः समाजकल्याण विभागाने आपल्या चौकशी अहवालात सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी महिलाबचत गटासोबत फोटो काढले, अन् साहित्य परत घेतलं

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या श्री साई ट्रेडिंग एजेंसी मार्फत साहित्य पुरवण्यात आली त्यावर दिलेल्या पत्त्यावर ती अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत पुढे आले आहे. महिलांच्या कौशल्य विकासासाठी नागपूरच्या समाजकल्याण विभागाच्या मार्फत जिल्ह्यातिल 100 महिला बचतगटांना 90 टक्के अनुदानावर शेतीपूरक साहित्य वितरित करण्यात आले होते. यात प्रत्येक महिला गटांना 7 लाख  मळणी यंत्र, कल्टिव्हेटर, साठवणूक साहित्य होते. मात्र समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलाबचत गटासोबत फोटो काढून योजना यशस्वी झाल्याचे जाहीर केले व साहित्य दोन दिवसानंतर परत घेऊन गेले. ही बाब महिला बचतगटांना जेव्हा लक्षात आले कि आपली फसवणूक झाली, तेव्हा महिलांनी आंदोलन उभे केले.  त्यानंतर हि चौकशी समिती गठित करण्यात आली होती.  

....तर आपण प्रधानमंत्र्यांकडे तक्रार करणार- श्यामकुमार बर्वे 

यानंतर या दोषी अधिकार्‍यांवर कुणाचा वरदहस्त आहे? कोण दोषी अधिकाऱ्यांना वाचवत आहे? असे प्रश्न रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपस्थित केला आहे. दोषींवर कारवाई झाली नाही तर आपण प्रधानमंत्र्यांकडे याची तक्रार करणार असल्याचे श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय? 

नागपूरमध्ये समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच काही महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांशी हातांशी पकडून मोठा घोटाळा (Scam) केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात तब्बल 8 कोटी 71 लाख रुपयाचे कृषी पूरक साहित्य वाटपात घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. जिल्ह्याच्या खनिज निधीतून 100 महिला बचत गटाला कृषिपूरक साहित्य वाटण्याची योजना तयार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी त्यासाठी 100 महिला बचत गटाची निवड केली आणि साहित्याचा वाटप केला गेला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी फोटो काढून योजना यशस्वी झाल्याचे दाखवले. मात्र काही दिवसानंतर  पुरवठादाराने वितरित साहित्य परत नेलं असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस

व्हिडीओ

Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report
Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Embed widget