आधी दोस्ती केली, त्यानंतर प्लॅन करून संपवलं; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण आले समोर
Abhishek Ghosalkar : सुरवातीला पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या रागातून मॉरिस नोरोन्हा ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात असून, त्याबाबत काही कारणं देखील समोर आली आहे.
![आधी दोस्ती केली, त्यानंतर प्लॅन करून संपवलं; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण आले समोर Abhishek Ghosalkar Firing Case Reason Investigation by Mumbai Police Morris Noronha planned and killed Abhishek Ghosalkar mumbai crime news marathi news आधी दोस्ती केली, त्यानंतर प्लॅन करून संपवलं; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण आले समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/44899ae5add486fa9740c44b79b6494e1707452816543737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abhishek Ghosalkar Firing Case : मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची (Abhishek Ghosalkar) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घोसाळकर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) तपास सुरु करण्यात आला असून, या घटनेमागे नेमकं कारण याचा देखील पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. सुरवातीला पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या रागातून मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) याने ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात असून, त्याबाबत काही कारणं देखील समोर आली आहे.
अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडून हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) विरोधात मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्यात कलम 376 नुसार बलात्कार आणि 509 विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक देखील झाली होती आणि काही महिने तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घेसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा होती आणि त्यातूनच त्यांच्यातील वैर वाढल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच प्लॅन करून अभिषेक घोसाळकरांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
आधी दोस्ती केली, त्यानंतर प्लॅन करून संपवलं...
बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. मात्र, जेलमधून बाहेर येताच मॉरीसने दोघांमधील वाद मिटल्याचा बनाव केला. पुढे काही दिवस अभिषेक घोसाळकरांबरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे अभिषेक यांच्या वाढदिवसाला मॉरिसने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. त्यामुळे अभिषेक यांचा देखील त्याच्यावर विश्वास बसला होता. मात्र, मॉरिसच्या डोक्यात वेगळचं सुरु होते. दरम्यान, त्याने गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्ताने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं. त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि आपल्यातील वाद संपले असल्याचे देखील दाखवले. पण काही क्षणातच घोसाळकरांवर थेट गोळीबार करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे घोसाळकरांची हत्या केल्यावर त्याने स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केली.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना
दरम्यान, या सर्व घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटत आहे. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील प्रतिक्रिया आली आहे. "अतिशय चुकीची घटना घडली आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. दोघांचे संभाषण स्पष्ट झाले. त्यांचे मित्रत्वाचे संबंध चांगले दिसत आहे. या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. विरोधक सरकारची बदनामी करत असून, मी कोणाचे ही समर्थन करत नाही," असे अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)