मॉरिस सकाळी म्हणाला हळदीकुंकू आणि साडी वाटप करु, संध्याकाळी घोसाळकरांचा स्वत:च्या कार्यालयात गेम केला
Abhishek Ghosalkar Firing Case : मुंबईचे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते (UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.
Abhishek Ghosalkar Firing Case : मुंबईचे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते (UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मेहुल पारीख आणि रोहित साहू यांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेकडे तपास सोपवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची पोलिसांकडे माहिती मागवली आहे. अभिषेक घोसाळकर याच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आयुष्य संपवलं. हा थरार ज्यावेळी घडला त्यावेळी लालचंद पाल तिथे उपस्थित होते. त्यांनी या घटनेचा सगळा थरार सांगितलाय. मॉरिस नोरोन्हा यानेच घोसाळकर याला बोलवलं होतं. हळदीकुंकू आणि साडी वाटप करु असे मॉरिसने घोसाळकर याला सांगून बोलवलं होतं, हे लालचंद पाल यांनी एबीपी माझाला माहिती दिली.
मॉरिस नोरोन्हा याच्याविरोधात लालचंद पाल यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मॉरिस याच्याविरोधात भा द वि ३०२ आणि हत्यार
कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लालचंद पाल यांनी गुरुवारी घडलेला घटनाक्रम एबीपी माझाला सांगितला आहे. संपूर्ण गोळीबार घटना त्यांच्या डोळ्याच्या समोर घडली होती.
मॉरिस सकाळी म्हणाला हळदीकुंकू आणि साडी वाटप करु
आरोपी मॉरिस यांनी सकाळी 11 वाजता कॉल करून अभिषेक घोसाळकर यांना बोलवलं होतं. संध्याकाळी आपल्याला हळदीकुंकू आणि साडी वाटप कार्यक्रम करायचा आहे. हा कार्यक्रम आपल्याला एकत्र करायचा आहे, त्यामध्ये तुम्ही या, असे सांगितलं होतं. त्यासाठी अभिषेक घोसाळकर यांनी सहा वाजता मॉरिश याच्या कार्यालयात गेले.
कार्यकर्त्यांना सांगितलं बाहेर बसा, आम्हाला FB Live करायचेय -
मॉरिसच्या कार्यक्रमात आपल्याला जायचे त्यासाठी काही कार्यकर्त्यांना बोलून घ्या, असे अभिषेक घोसाळकर यांनी साडेअकरा वाजता लालचंद पाल याना कॉल करून सांगितलं होतं. लालचंद पाल 15 ते 16 कार्यकर्त्यांघेऊन अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत आरोपीचा कार्यालयात गेले.कार्यालयात गेल्यानंतर आरोपीने सांगितला आम्हाला फेसबुक लाईव्ह करायचं तुम्ही बाहेर बसा आम्ही दोघे फेसबुक लाईव्ह करून बाहेर येणार आहेत,असे सांगितलं.
थरार डोळ्यासमोर घडला -
अर्धा तास झाला अभिषेक घोसाळकर बाहेर आले नाही त्यामुळे लालचंद पाल आवाज दिला. आवाज दिल्यानंतर मॉरिश बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं पाच मिनिटात फेसबुक लाईव्ह संपलं की बाहेर येतो. त्यानंतर दहा मिनिटानंतर गोळीबारची घटना सुरू झाली. मॉरीस हातात पिस्टल घेऊन अभिषेक घोसाळकर यांच्यावर फायर करत होता. यानंतर अभिषेक घोसाळकर खाली पडले बाहेर उभा असलेल्या सर्वांनी अभिषेक घोसाळकरला रुग्णवाहिका बोलवून करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेत.
स्वत:वर गोळीबाळ केला -
अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार करून मॉरिस पायऱ्यावरून पहिला मजल्यावर गेला. ऑफिसमध्ये पुन्हा दोन राउंड गोळी पिस्टलमध्ये भरले आणि स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे लालचंद पाल यांनी सांगितलं.
आणखी वाचा:
मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात