एक्स्प्लोर

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर विश्रांती घेणाऱ्या कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटलं; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर  

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे.

Samriddhi Highway : अपघातांच्या (Accident) मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. यात जवळजवळ अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल या अज्ञात दरोडेखोरांनी पळवून नेला आहे. ही धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर काल रात्री 3. 30 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे मात्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला आहे.

सोन्याच्या दागिन्यांसह रोख दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास  

समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या कारने (कार क्रमांक MH 12 JC 1919) मुंबईकडे जात होतं. या प्रवासादरम्यान रात्री 3-3.30 वाजेच्या सुमारास कारचाारकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ति त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सशस्त्र दरोडेखोरांनी कार मधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. या कुटुंबाचा नाईलाज असल्याने त्यांनी भयभीत होऊन होतं नव्हतं ते सारं त्यांच्या स्वाधीन करून जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. तसेच सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये त्यांच्या स्वाधीन केले. 

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी?

या अज्ञातांचा उद्देश सफल होताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. काही वेळानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, तात्काळ पोलीस मदत न मिळाल्याने सकाळ झाल्यानंतर या कुटुंबाने मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून सशस्त्र अज्ञात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला तर नाहीये ना, रात्री पोलिसांची मदत का मिळाली नाही? असे अनेक प्रश्न या निमत्याने उपस्थीत केले जात आहेत.   

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदेPankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितलाAaditya Thackeray : भाजप कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंची क्रेझ; राम कदमांनी फोटोसाठी थांबवलंAjit Pawar Vidhan Parishad Speech : गिरीश, आता तरी सुधर ,कट होता होता वाचलास; दादांचं जोरदार भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Chhagan Bhujbal: भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
Nana Patole on Beed: वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने, मंत्र्याचा वरदहस्त; नाना पटोले विधानसभेत काय म्हणाले?
नाना पटोलेंनी सभागृहात वाल्मिक कराडची कुंडली मांडली, 200 गुन्हे अन् मंत्र्यासोबतचं कनेक्शन सांगितलं
Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
Embed widget