एक्स्प्लोर

Sangli Crime News : पॅरोलवर असलेल्या गुन्हेगाराकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; सांगली शहरातील संतापजनक घटना 

Sangli : सांगली शहरातील संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार (Sexual Abuse) केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर  होता.

Sangli Crime News : सांगली शहरातील संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार (Sexual Abuse) केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर  होता. यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर या 35 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत संशयित आरोपीस आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी संशयित आरोपी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलंय. संशयित आरोपी हा 2011 साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 14 वर्षाची शिक्षा लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर आला होता. त्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे. एकीकडे बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या (Minor Abuse Case) प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता राज्यातील इतर अनेक भागातून देखील सातत्याने अशाच घटना पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून आता विचारला जाऊ लागलाय.

पोलिसांनी अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या 

हाती आलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात या प्रकरणातील आरोपीने पीडित मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र काल 23 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीसात तक्रार दिली.

तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपीस आटपाडी येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणबाजी केलीय.

16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती वसईच्या नायगाव मध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. नायगावच्या  एका शाळेच्या उपहागृहात काम करणार्‍या 16 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला आहे.

याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता राज्यातील इतर अनेक भागातून देखील सातत्याने अशाच घटना पुढे येऊ लागल्या आहेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 11 Feb 2025 : ABP MajhaTop 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaVaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Raigad DPDC meeting: शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
Embed widget