50 हजारांची नोकरी सोडून शेतीत ठेवलं पाऊल, आज तरुण वर्षाला मिळवतोय 50 लाख
अलीकडच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रयोगशील शेती करताना दिसत आहे. यामाध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत.
Success story: अलीकडच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रयोगशील शेती करताना दिसत आहे. यामाध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नरेंद्र सिंह चौहान या शेतकऱ्याने देखील 50 हजार रुपयांची नोकरी सोडून यशस्वी शेती सुरु केली आहे. तसेच फलोत्पादनासाठी रोपवाटिकेचा व्यवसाय या शेतकऱ्याने सुरु केला आहे. यामाध्यमातून चांगला नफा मिळत असल्याची माहिती शेतकरी चौहान यांनी दिलीय.
नरेंद्र सिंह चौहान यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शेतीचे शिक्षण घेतले होते. एमएसडब्ल्यू केल्यानंतर चंदीगडमध्ये नोकरी मिळाली, काही काळानंतर मित्राच्या सांगण्यावरुन आणि शेतीकडे त्यांचा कल वाढला. हे बघून त्यांनी फलोत्पादनाच्या रोपवाटिकेसाठी परवान्यासाठी अर्ज केला. परवाना मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला.आता त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
14 एकरात बागायती शेती
नरेंद्र सिंह चौहान यांना एका खासगी कंपनीत मासिक 50,000 रुपयांची नोकरी होती. ती नोकरी सोडून त्यांनी 14 एकरात बागायती शेती सुरू केली आहे. आता वार्षिक ते 50 लाख रुपये कमवत आहेत. नोकरी सोडल्यानंतर शेतकरी म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र चौहान यांच्या शेतात त्यांची बागायती शेती पाहण्यासाठी आणि त्यांच्याकडून शेतीची माहिती घेण्यासाठी देशभरातून शेतकरी येतात.
वर्षाला सुमारे 50 लाख रुपयांचे उत्पन्न
चौहान हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. प्रगतीशील शेतकरी नरेंद्र चौहान यांनी आजपर्यंत नोकरी केली असती तप त्यांना त्यांना महिना फक्त 50 हजार रुपये पगार मिळाला असता, म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 6 लाख रुपये मिळाले असते. मात्र, आता नोकरी सोडून ते शेती करत असून त्यांनी वर्षाला सुमारे 50 लाख रुपयांचे उत्पन्न होते.
शेती हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शेतीचे शिक्षण घेतले आणि एमएसडब्ल्यू केल्यानंतर चंदीगडमध्ये नोकरी मिळाली. काही काळानंतर मित्राच्या सांगण्यावरुन आणि शेती व्यवसायात उतरले. रोपवाटिकेसाठी परवान्यासाठी अर्ज केला, परवाना मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून फळबाग आणि रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. त्यांना फळबाग शेतीमध्ये एवढा रस होता की त्यांनी नोकरी सोडून लव्हली नर्सरी राणा 1990 मध्ये सुरू केली. 1995 मध्ये त्यांनी अखनूर भागातील उष्ण भागातून बदाम आणून आपल्या शेतात बदाम लागवडीला सुरुवात केली. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी सफरचंदाची लागवड केली. हरियाणातही सफरचंद पिकवता येते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आपल्या सफरचंदाचे नाव राणा गोल्ड अॅपल असे ठेवले.
शेतकऱ्यांनी फळबाग शेती करावी
चौहान यांच्या शेतात देशभरातून शेतकरी येतात. ते त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने माहिती घेतात. त्यांनी 14 एकरवर फळबाग लागवड केली असून त्यांना एकूण 60 एकर शेती आहे. त्यांच्या शेतात सफरचंद, बदाम, पीच, बटाटा, आंबा अशा सर्व फळांची बाग आहे. शेतकऱ्यांनी पारंपारीक गहू, तांदूळ शेती सोडून फळबाग शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला शेतीकडे वळावे
शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला शेतीकडे वळावे आणि अधिक नफा कमवावा असे आवाहन त्यांनी केले. फळबागा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार मदत करते आणि औषधे आणि खतांसाठी पैसेही देते. एखाद्या शेतकऱ्याने नवीन फळबागा लावल्यास त्या शेतकऱ्याला 50 टक्के अनुदानही दिले जाते. शेतकरी त्यांच्या शेतात 80 टक्केपर्यंत अनुदानावर ठिबक बसवू शकतात, ते सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत. खरेदी करण्यासाठी व्यापारी शेतात येत असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते फळांबरोबरच टोमॅटो, कोबी, अशा भाज्यांचेही उत्पादन घेतात. सध्या लिंबू लसूण पीक उपलब्ध आहे. ज्याचा वापर ते स्वतःच्या खाण्यासाठी करतात. नरेंद्र चौहान शेतकर्यांना जागरुक करतात, तसेच शेतकर्यांना फलोत्पादन करण्याचे आवाहनही करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
परदेशातील दीड लाखांची नोकरी सोडली, आज तरुण महिन्याला कमावतोय 3 लाख; सुरु केला 'हा' व्यवसाय