Ratan Tata Death: उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
Ratan Tata death in Mumbai: उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत निधन, उद्योगपती असूनही रतन टाटांविषयी सामान्यांच्या मनात आस्था आणि आदर का होता?
मुंबई: देशाच्या उद्योगविश्वातील आदरणीय आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. रतन टाटा यांच्या जाण्याने भारतीय उद्योग जगतातील एका पर्वाचा अंत झाला आहे. केवळ एक उद्योगपती म्हणूनच नव्हे तर आपली साधी राहणी, परोपकारी आणि दानशूर वृत्तीमुळे रतन टाटा (Ratan Tata) अनेकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान झाले होते. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, उद्योग, कला आणि सामान्य वर्ग अशा सर्वच स्तरातून शोकाकुल प्रतिक्रिया उमटत आहेत. याविषयी 'दैनिक लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना रतन टाटा हे इतक्या मोठ्या उंचीला का पोहोचले, याविषयी सविस्तर विवेचन केले.
रतन टाटांची महती आणि प्रभाव इतका का असावा याविषयी बोलताना गिरीश कुबेर यांनी म्हटले की, केवळ उद्योगपती या एका शब्दाने त्यांचे वर्णन करता येणे अयोग्य आहे, करणे अयोग्य आहे. याचे कारण असं की ते केवळ पैसा आणि उद्योग आणि संपत्ती निर्मिती करणारा एक व्यक्ती एवढ्यापुरतच मर्यादित नव्हते. भारतीय संस्कृती, भारतीय अभिजातता आणि भारतीय मातीच्या गरजा यांचा विचार करून ज्यांनी एक सम्यक साम्राज्याची, उद्योग साम्राज्याची निर्मिती केली असा तो द्रष्टा, संपत्ती निर्मितीकार होता असं त्यांचे वर्णन करावे लागेल. आणि सर्वसाधारणपणे भारतीय उद्योगपती हे भारत सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने त्याच्या कलाकलाने आपले उद्योग साम्राज्य रेखत असतात, आखत असतात. पण रतन टाटांनी असं कधीही केलं नाही. ज्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, सरकारी धोरणांच्या सहभागाची किंवा मदतीची गरज नाही अशा स्वरूपाची उद्योग स्वप्नं त्यांनी पाहिली. दुसरं असं की फार उद्योगपती या शब्दाशी जे जे काही बाकीचे नकारात्मकता जी जोडली गेलेली असते ती त्यांच्या बाबतीत कधीही झालं नाही. त्यांना कधीही ती नकारात्मकता शिवली नाही आणि ते सर्वसाधारण संपूर्ण आयुष्यभर आदरणीयच राहिले. अशी फार कमी माणसं आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे रतन टाटा यांच्या जाण्याने आपण नक्की काय गमावलंय ते मला असं वाटत की हे सुद्धा आपल्याला कळायला काही अवधी जावा लागेल, असे गिरीश कुबेर यांनी म्हटले.
जागतिक दर्जाच्या कंपन्यांवर ताबा मिळवून भारताची मान जगभरात उंचावली
जेआरडी टाटा, रतन टाटा असतील किंवा आणखी टाटा समूहाचे अन्य जे काही धुरीण होऊन गेले, सुनावाला आणि आणखी ती काही मंडळी असतील त्या सगळ्यांचे एक वैशिष्ट्य अस की त्याने प्रत्येकाला प्रत्येकाने देशासाठी वेगळं काही दिलं. म्हणजे जर जेआरडीचा विचार केला तर त्यांनी पहिली देशातली हवाई कंपनी आपल्या देशाला दिली, एअर इंडिया. पुन्हा, ही भारतीय आहे म्हणजे जवळपास 99% जनता जगातली त्यांच्या त्यांचा जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा चहा पितात तो बहुदा भारतीय असतो आणि त्याच श्रेय रतन टाटांना जातं. त्यांनी टेटली ही कंपनी टाटा समूहाचा भाग बनवून घेतली.
मोटारीच्या संदर्भात परत बोलायचं झालं तर जगामध्ये लोकप्रिय असेल असा भारतीय ब्रँड हा भारतीय मालकीचा कधीच नव्हता मोटारीच्या बाबतीमध्ये. ते केवळ रतन टाटा यांच्यामुळे शक्य झाले. हे केवळ आर्थिक विश्वात म्हणतोय त्याच्याशिवाय त्यांच अलीकडचं सगळ्यात ताज उदाहरण कौतुक करायला हवं, भारतीय माणसांनी लक्षात घ्यायला हवं. कारण भारतीय माणसांना रस्त्यावरची माणसे आणि रस्त्यावरची कुत्रे दोघांनाही हडतूड करायला आवडतं पण रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी या माणसांनी जे केलेले आहे त्याची तुलना फार किंवा अशक्यच आहे, असे गिरीश कुबेर यांनी म्हटले.
टाटांसाठी देश प्रथम, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार
मुंबईमध्ये चांगल्या अर्थाने एक जागतिक स्तरावरच प्राण्यांचे रुग्णालय नव्हतं आणि आपला कायदा असा होता की जिथे तुम्हाला रुग्णांना म्हणजे प्राण्यांना रात्रभर दाखल करून घ्यावं लागेल अशा स्वरूपाची व्यवस्था करायला बंदी होती. तो कायदा रतन टाटा यांच्यामुळे बदलला गेला आणि मुंबईमध्ये पहिलं जागतिक स्तरावरच प्राण्यांचे रुग्णालय केवळ रतन टाटांच्यामुळे तयार झालं आणि ते त्यांनी स्वतःच्या पैशातून उभं केलं, असे गिरीश कुबेर यांनी सांगितले.
रतन टाटा यांनी त्यांची काही तत्वं आयुष्यभर पाळली आणि एक ब्रीद होतं की त्यांनी देश प्रथम ठेवला. ते उद्योगपती होते, त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. जगातल्या अनेक मोठ्या कंपन्या अक्वायर केल्या, टाटा समूहात त्या दाखल करून घेतल्या. पण देश प्रथम हे ब्रीद कधी त्यांनी सोडलं नाही म्हणजे मिठापासून ते गाडीपर्यंत प्रत्येक ब्रँड टाटांचाच होता आणि प्रत्येक भारतीयाची नस त्यांनी ओळख. जसे होते तसेच सार्वजनिक आयुष्यात सुद्धा होते. त्यामुळे हे साधेपणासाठी त्यांना काही वेगळे प्रयत्न करावे लागले असं झालेलं नाही. तो त्यांच्या सादगी ज्याला हिंदीमध्ये अतिशय छान शब्द आहे सादगी असणं हे साधेपण असणं हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावचा भाग होता. हा टाटा घराण्याच्याच वैशिष्ट्याचा भाग आहे म्हणजे रतन टाटाच्या आधी जेव्हा जे आरडी टाटांकडे टाटा समूहाची धुरा होती 91 सालापर्यंत ते ऑफिसला येताना जवळच्या एका बेसच्या बस स्टँडवर त्यांना कार्यालयातला कर्मचारी थांबलेला दिसला तर त्यांनी त्याला गाडीमध्ये घेतलं.
तो कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या निष्कर्षापर्यंत आल्या होत्या, काहींनी केली सुद्धा होती, मात्र रतन टाटांनी टाटा समूहामध्ये खास करून कर्मचाऱ्यांची कपात करण्याच टाळलं. म्हणजे इतकी वर्ष ज्या कर्मचाऱ्यांनी साथ दिली, कंपन्या वाढवल्या, टाटा उद्योग समूहाच्या वृद्धीमध्ये हातभार लावला, त्या कर्मचाऱ्यांना मी कसं कामावरुन काढू, अशी त्यांची एक भूमिका समोर आलेली होती. कोरोनाच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांना फक्त नोकरीवर ठेवले नाही तर, जवळपास 500 कोटी रुपयांची त्यांची वैयक्तिक मदत त्यावेळेला दिली गेली.
आज आपल्याला हा प्रश्न पडायला हवा की सगळ्यांनाच का वाईट वाटते रतन टाटा गेल्यामुळे? याचे साधं कारण असं आहे की भारतीय जसं शिवाजी महाराजांच्या विषयी प्रत्येकाला आपलस असं वाटत असतं. याचे साधं कारण असं आहे की भारतामध्ये संपत्ती निर्मितीला सात्विकतेची जोड नव्हती ती टाटा समूहाने दिली. त्यांनी उपभोग शून्य स्वामी म्हणजे हे सगळ्याचा मी स्वामी आहे पण मी उपभोग घेणार नाही तो इतरांना तो उपभोग घेऊ देईल, ही जी वृत्ती आहे हे या वृत्तीमध्ये त्यांचे मोठेपण दडले आहे. ही वृत्ती भारतामध्ये फार अगदी मोजक्या लोकांनी दर्शवलेली आहे.
आणखी वाचा