Property in Mumbai : ...म्हणून मुंबईत घर घेणं महाग, टाटा रिॲलिटीच्या एमडींनी सांगितलं कारण
Property is Expensive in Mumbai : टाटा रिॲलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ यांनी एका चर्चेदरम्यान मुंबईत मालमत्ता महाग का आहे यामागचं कारण सांगितलं आहे.
Property is Expensive in Mumbai : मुंबईमध्ये (Mumbai) अनेकजण आपली स्वप्न घेऊन येतात. त्यातील एक स्वप्न म्हणजे स्वप्ननगरी मुंबईत आपलं छोटसं का होईना एक घर असावं. मात्र प्रत्येकाचं हे स्वप्नं पूर्ण होतंच असं नाही. कारण मुंबईत घरं घेणं हे सर्वसामान्यांना परवडेल असं स्वप्नं नाही. मुंबईतील मालमत्तेचे दर अव्वाच्या सव्वा (Property is Expensive) असतात. लाखो-करोडोंची मालमत्ता घेण्याचं स्वप्नं सामान्यांच्या खिशाला परवडणारं नाही. टाटा समुहाअंतर्गत येणाऱ्या टाटा रिॲलिटीचे (Tata Realty) व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी मुंबईत मालमत्तेचे दर अधिक का आहेत, यामागचं कारण सांगितलं आहे.
टाटा रिॲलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ (Tata Housing Development Company) यांनी एका चर्चेदरम्यान मुंबईत मालमत्ता महाग का आहे या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. संजय दत्त यांच्या मते, ज्या शहरात पायाभूत सुविधा (Infrastructure) चांगलं आहे, त्या ठिकाणी मालमत्तेचे दर अधिक असतात. कारण अशा ठिकाणी ग्राहक आपल्याला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा असणाऱ्या ठिकाणी राहण्यासाठी तयार असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नातील घराच्या सारखं नाही किमान त्या अपेक्षेच्या आसपास पोहोचणारी मालमत्ता मिळाली तर ते त्यासाठी पैसे खर्च करायला तयार असतात. यामुळे मुंबईत मालमत्ता इतक्या महाग आहेत.
Why are home prices in Mumbai so high? Sharp, candid response by the MD of Tata Realty. pic.twitter.com/2dzJAaIzey
— Vishal Bhargava (@VishalBhargava5) October 5, 2022
संजय दत्त यांनी पुढे सांगितलं की, ग्राहक त्यांना अपेक्षित सुविधा मिळण्यासाठी हव्या त्या दरात मालमत्ता खरेदी करण्यासाठी तयार असतात. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. अपुरी वाहतुकीची साधने, वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि त्यात होणारा मानसिक ताण टाळण्यासाठी लोक आपल्या ऑफीसच्या आसपास अधिक मजबूत पायाभूत सुविधा असणाऱ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करणं पसंत करतात आणि त्यासाठी ते पैसे खर्च करण्यासाठीही तयार असतात. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने नोकरी धंद्यानिमित्त अनेक जण राज्यातून आणि देशातून मुंबईत येतात. त्यामुळे मागणी वाढते. त्यामुळे मुंबईत मालमत्तांचे दर अधिक आहे, असं संजय दत्त यांचं मत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या