हजारो कोटी लुबाडणाऱ्या 'क्रिप्टोक्वीन'चा अमेरिकेला शोध, शोधणाऱ्याला मिळणार 42 कोटींचं बक्षीस!
सध्या क्रिप्टोकरन्सीची जगभरात चर्चा आहे. याच क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने लोकांना कोट्यवधी रुपयांना लुबाडणाऱ्या क्रिप्टोक्वीनला अमेरिका शोधत आहे.
वाॉशिंग्टन: सध्या क्रिप्टेकरन्सीची सगळीकडे चर्चा आहे. जगात वेगवेगळ्या देशांत या क्रिप्टेकरन्सीसाठी वेगवेगळे नियम आहेत. दरम्यान, याच क्रिप्टो जगतातील प्रसिद्ध अशा रुजा इग्नाटोव्हा यांच्यावर अमेरिकने 50 लाख डॉलर्स म्हणजेच साधारण 42 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. जगभरात त्या क्रिप्टोक्वीन म्हणून प्रसिद्ध आहेत. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिप्टोक्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुजा इग्नाटोव्हा यांनी नेमकं काय केलंय? त्यांचा शोध अमेरिका का घेत आहे? हे जाणून घेऊ या.
400 कोटी डॉलर्सचा चुना लावला (Cryptoqueen Ruja Ignatova Fraud)
रुजा इग्नाटोव्हा यांना शोधून देणाऱ्याला अमेरिकेने 42 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. या क्रिप्टोक्वीनने 'वनकॉईन' नावाने एक बनावट, खोटी क्रिप्टोकरन्सी चालू केली होती. या क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने त्यांनी जगभरातील लोकांना तब्बल 400 कोटी डॉलर्सचा चुना लावल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात अमेरिका आणि जर्मनी या दोन्ही देशांत गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. ऑक्टोबर 2017 त्यांनी अमेरिकेतून पळ काढला. तेव्हापासून त्या फरार आहेत. सध्या अमेरिकेच्या एबीआयकडून त्यांचा शोध घेतला जातोय.
रुजा इग्नाटोव्हा कोण आहे? (Who is Cryptoqueen Ruja Ignatova)
रुजा इग्नाटोव्हा या मूळच्या बुल्गारिया येथील असून त्या जर्मन नागरिक आहेत. त्या 44 वर्षांच्या आहेत. त्यांनी सेबस्टियन कार्ल ग्रीनवूड या आपल्या सहकाऱ्याला सोबत सुरुवातीला बिकॉईन नावाने एक फसवी क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली होती. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये सोफिया येथे वनकॉईन नावाने आणखी एक फसवी क्रिप्टोकरन्शी लॉन्च केली होती. या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने रुजा इग्नाटोव्हा यांनी लोकाकडून अब्जो डॉलर्स जमा केले होते. त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की वनकॉनईन नावाची क्रिप्टोकरन्सी ही बनावट आहे. या क्रिप्टोकरन्सीच्या सुरक्षेसाठी ब्लॉकचेन नाही, हे तथ्य समोर आले होते.
लोकांना कसं लुबाडलं? (Cryptoqueen Ruja Ignatova Fraud Case)
अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वनकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायचे तेव्हा त्यांना अनाकलनीय आकडे दिसायचे. हा जगातील सर्वांत मोठा फ्रॉड आहे, असं अमेरिकन सरकारे म्हटलंय. वनकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना तुम्ही आणखी लोकांना प्रोत्साहित करावे, असे सांगितले जायचे. त्यानंतर नव्याने आलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन जुन्या गुंतवणूकदारांचे पैसे दिले जायचे. वनकॉईन या फसव्या क्रिप्टोकरन्सीची किंमत नेहमीच चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून ठरवली जायची. एकीकडे बिटकॉईनच्या किमतीत चढ-उतार दिसायचे. पण वनकॉईनची किंमत सतत वाढलेली दिसायची. जानेवारी 2015 मध्ये या वनकॉईनची किंमत 0.5 युरो होती. हीच किंमत जानेवारी 2019 मध्ये थेट 29.95 युरो झाली होती.
साथीदाराला 20 वर्षांची शिक्षा
'वनकॉईन' या क्रिप्टोरकन्सीसाठी 'एक्सकॉइनएक्स' नावाचे खासगी एक्स्जेचं तयार करण्यात आले होते. लोकांना सहज पद्धतीने पैसे काढता येऊ नयेत, अशी त्याची रचना करण्यात आली होती. समजा तुमच्याकडे 1,000 'वनकॉईन' असतली तर एका दिवसात तुम्हाला फक्त 15 (1.5%) वनकॉईनच विकता येत होते. जानेवारी 2017 मध्ये से 'एक्सकॉइनएक्स' मेन्टेनन्सच्या नावाखाली अचानकपणे बंद करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. इग्नाटोव्हा यांच्याविरोधात आरोपपत्र निश्चित झाल्यानंत त्या 2017 मध्ये विमानामध्ये फरार झाल्या. इग्नोटोव्हा यांचे साथीदार ग्रीनवूड यांना 2018 साली थायलँडमध्ये अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. ग्रीवूड यांना 20 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला तसेच गुंतवणूकदारांना त्यांनी 30 कोटी डॉलर परत करावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.
हेही वाचा :
मोठी बातमी! HDFC बँकेचे 'हे' नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार, वाचा तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार?
जिओ, एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियाचेही डेटा प्लॅन्स महागले; जाणून घ्या नेमकी वाढ किती?