जिओ, एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियाचेही डेटा प्लॅन्स महागले; जाणून घ्या नेमकी वाढ किती?
रिलायन्स जिओने आपल्या डेटा प्लॅन्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता व्होडाफोन आयडियानेही आपल्या डेटा पॅकमध्ये वाढ केली आहे.
मुंबई : देशातील सर्वांत मोटी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नुकतंच आपल्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. जिओच्या या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. विशेष म्हणजे जिओच्या या निर्णयानंतर भारती एअरटेलनेही आफल्या डेटा प्लॅन्समध्ये वाढ केली आहे. आता या दोन्ही मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या निर्णयानंतर आता व्होडाफोन-आयडिया या कंपनीनेही आपल्या टेडा प्लॅन्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. जिओने आपल्या डेटा प्लॅन्समध्ये 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर आता व्होडाफोनने आपल्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये केलेली ही वाढ 11 ते 23 टक्के आहे.
व्होडाफोनने 28 दिवसांच्या अनिलमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या प्लॅनवर साधारण वाढ केली आहे. अगोदर हा प्लॅन 179 रुपये होता. आता हाच प्लॅन 199 रुपयांना मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 जीबी इंटरनेट डेटा, अमर्याद कॉलिंग, 300 मेसेजेस मिळतात. 84 दिवसांचा डेटा प्लॅन अगोदर 459 रुपयांना असायचा आता हाच प्लॅन 509 रुपयांना झाला आहे. 1799 रुपयांचा वार्षिक डेटा प्लॅन आता 1999 रुपये झाला आहे. या डेटा प्लॅनमध्ये ग्राहकांना 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.
जिओचे नवे डेटा प्लॅन 3 जुलैनंतर लागू
जिओने आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये 12.5 टक्क्यांपासून 25 टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे. हे नवे डेटा प्लॅन्स 3 जुलैपासून लागू होतील. जिओने एकूण 19 प्लॅन्समध्ये वाढ केली आहे. यामध्ये 17 प्रिपेड तर 2 पोस्ट पेड डेटा प्लॅन्सचा समावेश आहे.
एअरटेलनेही वाढवले डेटा प्लॅन्स
एअरटेलनेही आपल्या प्रिपेड डेटा प्लॅन्समध्ये 11 ते 21 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर पोस्टपेड डेटा प्लॅन्समध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एंट्री लेव्हलच्या प्रिपेड प्लॅन्सची किंमत 11 टक्क्यांनी वाढून 199 रुपये प्रतिमहिना करण्यात आला आहे. याअगोदर हा प्लॅन 175 रुपये प्रतिमहिना होता. गेल्या वर्षी हाच प्लॅन 155 रुपये प्रतिमहिना आहे. म्हणजेच गेल्या एका वर्षात या बेसिक डेटा प्लॅनवर 28 टक्क्यांची वाढ करण्यात आल आहे. एक वर्ष वैधता असलेल्या डेटा प्लॅनमध्ये 20 ते 21 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अगोदर हा प्लॅन 2,999 रुपये होता. आता हाच प्लॅन 3,599 रुपये करण्यात आलाय. 56 दिवसांची वैधता असलेला डेटा प्लॅनची किंमत 579 रुपये होती. या डेटा प्लॅन अंतर्गत प्रतिदिन 2 जीबी डेटा दिला जातो.
हेही वाचा :
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!