एक्स्प्लोर

सोन्याच्या गुंतवणुकीतून मोठा परतावा, दिल्ली ते मुंबई काय आहेत सोन्याचे दर? 

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होताना दिसतेय. वाढत्या दराचा सोने खरेदीदारांना मोठा फटका बसतोय. आज बाजारात सोन्या चांदीचे दर काय आहेत याबाबतची माहिती पाहुयात.

Gold Silver Price : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होताना दिसतेय. वाढत्या दराचा सोने खरेदीदारांना मोठा फटका बसतोय. सोन्यामध्ये गुंतवणूक (Invetsment) करणं ग्राहकांच्या फायद्याचंही ठरत आहे. कारण सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. काल देशा देशात अक्षय तृतीयेचा सण साजरा झाला. या दिवशी देखील सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहयाला मिळाले. दरम्यान, आज सोन्या चांदीचे नेमके दर काय आहेत? कोणत्या शहरात किती दर? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जाते. त्यामुळं काल मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी झाली. हलक्या वजनाचे दागिने किंवा सोन्याची नाणी घेण्याकडे लोकांचा कल दिसून आला. दरम्यान, आज नेमके सोन्याचे दर काय आहेत. याबाबतची माहिती पाहुयात. 

कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर?

दिल्ली -22 कॅरेट सोने - 67,400, 24 कॅरेट सोने - 73,510 तर चांदी- 87,000 किलो
मुंबई - 22 कॅरेट सोने - 67,250, 24 कॅरेट सोने - 73,360 तर चांदी- 87,000 किलो
चेन्नई - 22 कॅरेट सोने - 67,500, 24 कॅरेट सोने - 73,640 तर चांदी- 90,500 किलो
कोलकाता - 22 कॅरेट सोने - 65,250, 24 कॅरेट सोने -73,360, चांदी- 87,000 
लखनऊ - 22 कॅरेट सोने - 67,400, 24 कॅरेट सोने -73,510, चांदी- 87,000 
अहमदाबाद - 22 कॅरेट सोने - 67,300, 24 कॅरेट सोने -73,410, चांदी- 87,000

वर्षभरापूर्वी सोन्याचा दर किती?

दरम्यान, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी म्हणजे 9 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 71,502 रुपये होता. मागील वर्षी याच दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा  60,616 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. पण वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झालीय. सोन्याच्या गुंतवणुकीवर वर्षभरात 18 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. 2014 मध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत 28,871 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. जी 2017 पर्यंत जवळपास स्थिर होती. मात्र, 2017 नंतर सोन्याच्या दरात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत गेली. आज सोन्याच्या दरानं 73 हजारांचा टप्पा गाठला आहे. 

कोणत्या साली किती वाढ झाली? 

मिळालेल्या माहितीनुसार  2018 मध्ये सोन्याची किंमत 31,598 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. जी 2019 मध्ये 31,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली. यानंतर 2020 मध्ये सोन्याने उसळी घेतली आणि त्याची किंमत 46,527 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली. त्यानंतर 2021 मध्ये तो 47,700 रुपये, 2022 मध्ये 50,800 रुपये आणि 2023 मध्ये सोन्याचा भाव 60,616 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.

महत्वाच्या बातम्या:

सोन्याचा वापर करण्यात भारत आघाडीवर, 'या' देशातून होते सर्वाधिक सोन्याची आयात? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget