गुगलने लॉन्च केलेल्या 'गुगल वॉलेट'चा नेमका उपयोग काय? गुगल पे खरंच बंद होणार का? जाणून घ्या...
गुगलने आता गुगल वॉलेट लॉन्च केले आहे. या अॅपमुळे गुगल पे बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याच पार्श्वभूमीवर हे नवे अॅप काय आहे? हे जाणून घेऊ या...
![गुगलने लॉन्च केलेल्या 'गुगल वॉलेट'चा नेमका उपयोग काय? गुगल पे खरंच बंद होणार का? जाणून घ्या... what is google wallet what is use of google wallet will phonepe shutdown know detail information in marathi गुगलने लॉन्च केलेल्या 'गुगल वॉलेट'चा नेमका उपयोग काय? गुगल पे खरंच बंद होणार का? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/3fb607fa8be33b325a74617358e8fa3b1715159058522988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गुगल कंपनीची अशी अनेक उत्पादनं आहेत, ज्यामुळे लोकांचं जगणं फार सोपं झालंय. गुगलने आता नुकतंच 'गुगल वॉलेट' (Google Wallet) नावाचं नवं ॲप लॉन्च केलं आहे. अँड्रॉईड वापरकर्त्यांना हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. हे ॲप आल्यानंतर आता गुगल पे हे ॲप बंद होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुगल वॉलेट हे नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या...
आता आलं गुगल वॉलेट, नेमका उपयोग काय? (What is Google Wallet)
यूजर्स गुगल वॉलेट हे ॲप डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड स्टोअर करण्यासाठी वापरू शकतात. हे एक डिजिटल वॉलेट असून अँड्रॉईड वापरकर्त्यांना ते वापरता येणार आहे. गुगलने सांगितल्यानुसार या ॲपचा वापर वेगवेगळे कार्ड्स, चित्रपटाचे टिकट, बोर्डिंग पास, आयडी कार्ड साठवून ठेवण्यासाठी करता येईल. गुगल वॉलेट हे ॲप गुगल पे ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. गुगल पेचा (Google Pay) पैशांचा वापर, बील देण्यासाठी करता येतो. गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल पे हे ॲप बंद होणार नाही. दुसरीकडे गुगल वॉलेट हे ॲप नॉन पेमेंट ॲप आहे. त्यामुळे गुगल पे वर त्याचा काहीही परिणाम पडणार नाही, असे गुगलने सांगितले आहे.
गुगल वॉलेटचा 20 ब्रँड्सशी करार (What is use of Google Wallet)
या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे डिजिटल डॉक्यूमेंट्स सुरक्षित ठेवता येणार आहेत. भारतात लॉन्च होण्यापूर्वी गुगलने एकूण 20 ब्रँड्सशी करार केला आहे. यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, एअर इंडिया, इंडिगो, फ्लिपकार्ट, पाईन लॅब्स, कोच्ची मेट्रो या ब्रँड्सचा समावेश आहे. गुगल वॉलेटमुळे चित्रपट पाहणे, प्रवास, गिफ्ट कार्ड्स यांचा वापर सोपा होणार आहे.
भारतासह 79 देशात आहे गुगल पे
गुगल पे हे ॲप भारतासह एकूण 79 देशात वापरले जाते. याआधी गुगल पेला अँड्रॉईड पे म्हणून ओळखले जायचे. गुगल पेच्या मदतीने तुम्ही कोणतेही बील देऊ शकता. कोणालाही पैसे पाठवू शकता.
हेही वाचा :
पर्सनल लोन घेताय? गडबड करू नका, अगोदर 'या' सहा गोष्टी तपासून घ्या; अन्यथा कर्जाच्या विळख्यात अडकाल!
अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर असताना सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा भाव काय?
नावाला पेनी स्टॉक, पण शेअर बाजारावर सुस्साट, 'या' दहा कंपन्यांत छप्परफाड कमाई!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)