कंपन्यांनी नफा मिळवण्यासाठी काय करावं? इन्फोसिसचे प्रमुख नारायण मुर्तींनी सांगितले 'हे' मार्ग
इन्फोसिस कंपनीचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या नफ्याच्या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. कंपन्यांनी नफा मिळवण्यासाठी नेमकं काय करावं, याबबातची माहिती नारायण मूर्ती यांनी दिली आहे.
Narayana Murthy : इन्फोसिस (infosys) ही भारतातील (India) आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. नारायण मूर्ती (Narayana Murthy) हे या कंपनीचे प्रमुख आहेत. मूर्ती यांनी कंपनीच्या नफ्याच्या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. कंपन्यांनी नफा मिळवण्यासाठी नेमकं काय करावं, याबबातची माहिती नारायण मूर्ती यांनी दिली आहे. त्यांनी नफा मिळवण्यासाठीचे दोन मार्ग सांगितले आहेत. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि आदर मिळवणे महत्त्वाचे
इन्फोसिस या कंपनीचे स्थापनेपासूनच केवळ नफा मिळवणे हे उद्दिष्ट नाही तर सन्मान मिळवणे हे देखील आहे. त्यांची टीम इन्फोसिसला भारतातील सर्वात प्रतिष्ठित कंपनी बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपन्यांच्या वाढीसाठी आणि नफा मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि आदर मिळवणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला नारायण मूर्ती यांनी दिला आहे. नारायण मूर्ती हे पाच दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आयटी उद्योगातील दिग्गज व्हिएतनामची माहिती तंत्रज्ञान कंपनी FPT चे अध्यक्ष ट्रुओंग गिया बिन्ह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात यशस्वी कंपनीच्या आवश्यक गोष्टींपासून ते येत्या काही वर्षांत विकसित देश बनण्याच्या व्हिएतनामच्या क्षमतेपर्यंतच्या विषयांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या कामाचे, त्यांच्या क्षमतेचे कौतुक करणं गरजेचं
इन्फोसिसच्या स्थापनेपासूनच त्यांच्या कंपनीचे उद्दिष्ट केवळ नफा मिळवण्याऐवजी सन्मान मिळवणे हे आहे. त्यांची टीम इन्फोसिसला भारतातील सर्वात प्रतिष्ठित कंपनी बनवण्यासाठी काम करत आहे. ग्राहकांचा आदर नफ्यात रुपांतरित होतो. उच्च प्रतिभेला आकर्षित करतो. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल, तर कंपन्यांनी हे साध्य करणे आवश्यक असल्याचे मूर्ती म्हणाले. तसेच जगभरातील अनेक यशस्वी उद्योगपती त्यांच्या कंपन्यांचे 75 टक्के शेअर्स कनिष्ठ अधिकाऱ्यांना देतात. इन्फोसिस देखील याचे पालन करत असल्याचे मूर्ती म्हणाले. तसेच कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कंपनीचा आदर करणं देखील गरजेचं असल्याचे मूर्ती म्हणाले. तसेच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिर्घकाळ काम करण्यासाठी त्यांना टिकवून ठेवणारी परिस्थिती निर्माण करावी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे, त्यांच्या क्षमतेचे कौतुक कराव असेही मूर्ती म्हणाले.
अशियातील इतर देशांच्या तुलनेत व्हिएतनामचा वेगानं विकास होतोय
दरम्यान, यावेळी बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, व्हिएतनाम हा देश विकसीत होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशियातील इतर देशांच्या तुलनेत व्हिएतनामचा वेगानं विकास होत असल्याचे मूर्ती म्हणाले. भविष्यात देखील व्हिएतनामचा आणखी वेगानं विकास होईल असे मत नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
Narayan Murthy : नारायण मूर्ती आजही आठवड्यातून 70 तास काम करतात; ते कॉर्पोरेट गांधी, पण मी कस्तुरबा नाही; नेमक्या काय म्हणाल्या सुधा मूर्ती?