अमेरिकेतही महागाईचा फटका; फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ, भारतीय शेअर बाजारावर परिणाम?
us bank :भारतात रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर आता अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हनं देखील व्याजदरात वाढ केली आहे.या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
US Recession : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीत अडकण्याची दाट शक्यता आहे. भारतात रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर आता अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हनं देखील व्याजदरात वाढ केली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकी फेडनं आक्रमक पावलं उचलली आहेत. फेडकडून अपेक्षेप्रमाणे अर्ध्या टक्क्यांनी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी घोषणा केली आहे.
2000 सालानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात अमेरिकेत व्याजदर वाढवले आहेत. व्याजदरात वाढ केल्याने अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होण्याची फेडला अपेक्षा आहे. भारतात आरबीआयकडून देखील कालच महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं देखील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आज भारतीय शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशातील महागाईच्या प्रचंड संकटाला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेत मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर फेडरल रिझर्व्हला हा दर 2 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. फेडरल रिझर्व्हच्या समितीने मार्चच्या सुरुवातीला खुल्या बाजारावरील धोरणात्मक व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवला होता.
अमेरिकन शेअर बाजारासाठी एप्रिलचा महिना निराशाजनक राहिला. नॅसडॅक निर्देशांकासाठी एप्रिलचा महिना हा ऑक्टोबर 2008 नंतरचा सर्वाधिक वाईट महिना ठरला. S&P साठीदेखील एप्रिल महिना मार्च महिना 2020 नंतरचा सर्वात वाईट महिना ठरला. यामुळे अमेरिकेत मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत येत्या काळात बेरोजगारीतही वाढ होणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत आर्थिक मंदी आल्यास त्याचा परिणाम जगावर होण्याची भीती आहे. वर्ष 2008 मध्ये लेहमन ब्रदर्स बँकेच्या आर्थिक संकटामुळे अमेरिकेत मंदी आली होती. त्यानंतर मार्च 2020 मध्ये कोरोना महासाथीने जगभरातील शेअर बाजार कोसळले होते.
अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला असून ही स्थिती आणखी काही काळ राहू शकते. महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या
US Recession : जगाचे टेन्शन आणखी वाढणार; अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीचे ग्रहण?