एक्स्प्लोर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या महागाई भत्त्याचा दर 46 टक्के आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. यावेळीही 4 टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेला आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो

महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार

हा महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबरमध्ये निर्देशांक 0.3 अंकांनी घसरून 138.8 अंकांवर आला होता. परंतू, यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडला नाही. अपेक्षेप्रमाणे, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. 

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. 1 जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे नवीन महागाई भत्ता 1 जानेवारीपासूनच लागू होईल. याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे. आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के डीए जोडला जाईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 9000 रुपयांची वाढ होईल. जेव्हा जेव्हा नवीन वेतनश्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो. नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा 100 टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु ते शक्य नाही. आर्थिक परिस्थिती अडचणीत येते. मात्र, हे 2016 साली करण्यात आले. त्यापूर्वी 2006 साली सहावी वेतनश्रेणी आली, त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत 187 टक्के भत्ता दिला जात होता. संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला. त्यामुळे सहाव्या वेतनश्रेणीचा गुणांक 1.87 होता. 

महत्वाच्या बातम्या:

7th Pay Commission : नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्त्यात 50 टक्क्यांंपर्यंत वाढण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Telly Masala : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM  :27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPrakash Ambedkar : विधानसभेला काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात - प्रकाश आंबेडकरOnion Export : 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णयAjit Pawar Full Speech Pune Ambegaon :आधी ताईंची नक्कल,मग खरमरीत टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Telly Masala : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Salman Khan House Firing :  टार्गेट मुंबईतील सलमान खान, प्रॅक्टिस बिहारमध्ये!आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
टार्गेट मुंबईतील सलमान खान, प्रॅक्टिस बिहारमध्ये!आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
पंकजा मुंडेंनी नाशिक लोकसभेबाबत वक्तव्य घेतलं मागे, म्हणाल्या, नासमझ लोकांनी वेगळाच अर्थ लावला; मनातली सल बोलून दाखवत कोणावर साधला निशाणा?
पंकजा मुंडेंनी नाशिक लोकसभेबाबत वक्तव्य घेतलं मागे, म्हणाल्या, नासमझ लोकांनी वेगळाच अर्थ लावला; मनातली सल बोलून दाखवत कोणावर साधला निशाणा?
Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये चढताना अडखळून पडल्या, दुखापत झाली पण...
VIDEO: ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये चढताना अडखळून पडल्या, दुखापत झाली पण...
Embed widget