एक्स्प्लोर

Union Budget 2021: बजेटच्या दिवशी सोनं खरेदी स्वस्त, सॉवरेन गोल्ड बॉण्ड विक्रीला आजपासून सुरुवात

सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आजपासून पाच दिवस स्वस्तात सोनं खरेदी करता येणार आहे. आरबीआयने सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4912 रुपये म्हणजे प्रति तोळा 49120 रुपये इतकी ठरवली आहे.

Sovereign Gold Bond: अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सॉवरेन गोल्ड बॉण्डची 11 वी मालिका आजपासून गुंतवणुकदारांसाठी खुली होणार आहे. ही योजना एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी आरबीआयच्या वतीनं 10 ग्रॅम सोने म्हणजे एक तोळे सोन्यासाठी 49,120 रुपये इतका भाव ठरवण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी लोकांना स्वस्तामध्ये सोने खरेदी करता येणार आहे.

आरबीआयने सॉवरेन गोल्ड बॉण्डची किंमत प्रति ग्रॅम 4,912 रुपये इतकी निर्धारित केली आहे. तर या बॉण्डची ऑनलाईन खरेदी करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना सोने प्रति ग्रॅम 4,862 रुपये म्हणजेच 48,620 रुपये प्रति तोळा इतक्या किंमतीला खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

आरबीआयने स्पष्ट केलं आहे की सॉवरेन गोल्ड बॉण्डची नॉमिनल किंमत ही 4,912 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. ही किंमत इंडियन बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिडेट (IBJA) द्वारे 27 ते 29 जानेवारी दरम्यान 999 शुद्ध सोन्याच्या सरासरी क्लोजिंग मूल्यावर निर्धारित केली आहे.

या आधी सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी इश्यू प्राइस ही 5104 रुपये प्रति ग्रॅम इतकी होती. ती 11 जानेवारी ते 15 जानेवारी या काळासाठी आरबीआयच्या वतीनं खुली करण्यात आली होती.

Budget 2021: बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी सरकारकडून पैसा येतो कुठून? उत्पन्नाची माध्यमं कोणती?

कुठे खरेदी करायचे गोल्ड बॉण्ड? सॉवरेन गोल्ड बॉण्ड खरेदी करायचे असतील तर ग्राहकाकडे PAN कार्ड असणं गरजेचं आहे. गोल्ड बॉण्डची खरेदी ऑनलाईन करता येऊ शकेल. त्याचसोबत बॅक, स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट ऑफिस आणि मुंबई शेअर बाजारामधून या गोल्ड बॉण्डची खरेदी करता येऊ शकेल. या बॉण्डची सेटलमेन्ट डेट ही 9 फेब्रुवारी ही ठरवण्यात आली आहे.

किती प्रमाणात गुंतवणूक करु शकतो? एका वर्षाच्या काळात गुंतवणुकदार हा जास्तीत जास्त 400 ग्रॅम सोने खरेदी करु शकतो. तर कमीत कमी एक ग्रॅम सोनं खरेदी करता येते. एखादा ट्रस्ट गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त 20 किलो सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकतो.

याचे फायदे काय? गोल्ड बॉण्ड हे टॅक्स फ्री असतात. त्याचसोबत यामध्ये एक्सचेन्ज रेशो नसतो. भारत सरकारच्या वतीनं ही विक्री करण्यात येत असल्याने याच्या गुंतवणुकीत कोणताही धोका नाही. तसेच सोने खरेदी करुन ते घरी ठेवण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्यास ती कधीही सुरक्षित असते. महत्वाचं म्हणजे याची विक्रीही सोपी असते आणि यावर कर्जही मिळू शकते.

अर्थव्यवस्था कोरोनाच्या सावटातून बाहेर; सरकारी तिजोरीत पहिल्यांदाच 1.20 लाख कोटी जीएसटी जमा

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget