एक्स्प्लोर

Unified Pension Scheme : यूनिफाइड पेन्शन योजना नेमकी काय? केंद्र सरकारनं मंजुरी दिलेल्या योजनेच्या तरतुदी कोणत्या? एनपीएस सुरु राहणार? 

Unified Pension Scheme: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकार यूनिफाइड पेन्शन योजना सुरु करण्याबाबत घोषणा केली.  

Unified Pension Scheme नवी दिल्ली: केंद्रातील  राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील कॅबिनेटनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचं नाव यूनिफाइड पेन्शन स्कीम असं आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे 2004 ते 2025 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल. यामध्ये त्यांना व्याज आणि फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. जगभरातील पेन्शन योजनांचा आढावा घेतल्यांनंतर आणि अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर यूनिफाइड पेन्शन योजनेचा पर्याय सूचवण्यात आला होता. या योजनेला कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी सरकारी कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना आणि यूनिफाइड पेन्शन योजना या दोन्ही पैकी एका योजनेचा लाभ घेऊ शकतात अशी माहिती दिली.  

यूनिफाईड पेन्शन योजनेच्या चार महत्त्वाच्या बाबी 

कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीनंतर निश्चित रकमेची मागणी केली जात होती. यूपीएसनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या पूर्वी शेवटच्या वर्षातील 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्मक दिली जाईल.  कर्मचाऱ्यांनी 25 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबासाठी फॅमिली पेन्शनची तरतूद असेल. यानुसार कुटुंबाला 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 25 वर्षांपेक्षा कमी असल्यास त्याला 10 हजार रुपये पेन्शन मिळेल.  

अश्विनी वैष्णव यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल

अश्विनी वैष्णव यांनी यूपीएसची घोषणा करताना विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष केवळ जुन्या पेन्शन योजनेवरुन राजकारण करतात. राष्ट्रीय पेन्शन योजनेत सुधारणेची मागणी सातत्यानं केली जात होती. त्यानंतर डॉ. सोमनाथन समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार यूपीएस योजना आणली असून याचा फायदा केंद्र सरकारच्या 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. यूपीएसमध्ये केंद्र सरकार 18.5 टक्के योगदान देणार आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची भूमिका जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी होती. त्यासाठी त्यांनी यापूर्वी आंदोलनं देखील केली होती.

संबंधित बातम्या : 

UPS Scheme: मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची कॅबिनेटची मंजुरी

Bank Holidays In September:सप्टेंबरमध्ये सणांचा धडाका, बँकांना किती दिवस सुट्टी? किती दिवस बँका बंद राहणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्तेंच्या फोनवरील संभाषणाची क्लिप व्हायरल, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सJalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्तेंच्या फोनवरील संभाषणाची क्लिप व्हायरल, नेमकं काय म्हणाले?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Embed widget