मुहूर्ताच्या हळदीस दराची झळाळी, सांगलीच्या बाजार समितीत 31000 रुपयांचा उच्चांकी दर
हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Turmeric Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हळदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीचे सौदे पार पडले.
Turmeric Rate : हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Turmeric Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हळदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीचे सौदे पार पडले. या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला 31000 इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. नवीन हळद सौदे शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील यांचे शुभहस्ते तसेच बाजार समितीचे सभापती सुजय (नाना) अशोकराव शिंदे यांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
मुहूर्ताचा नवीन हळद सौदे शुभारंभ श्री गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी येथून सुरुवात झाली. प्रथमतः हळद शेतीमाल पोत्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सौदे पुकारण्यात आले. जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानात राजेंद्र आनंदराव पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळद या शेतमालास उच्चांकी 31000 रुपयांचा दर मिळाला. दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने या हळदेची खरेदी केली.
मसाला पिकांमध्ये हळदीला (Turmeric) विशेष स्थान आहे. हळदीची लागवड (Turmeric Farming) देशभरात केली जाते, तर प्रत्येक घरात ती वापरली जाते. हळदीचा वापर मसाला म्हणून केला जातो. याच्या वापराने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हळदीला जेवढे औषधी महत्त्व आहे, तेवढेच धार्मिक महत्त्वही आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. हळदीला बाजारपेठेत खूप मागणी आहे. त्यामुळं तिला चांगला भाव मिळतो. याशिवाय आजकाल हळदीचा वापर अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही केला जातो.
जगभरात वापरल्या जाणार्या हळदीपैकी 80 टक्के उत्पादन भारतात
जगभरात वापरल्या जाणार्या हळदीपैकी 80 टक्के हळदीचे उत्पादन एकट्या भारतात होते. शेतकरी हळदीची लागवड करून चांगला नफाही मिळवत आहेत. खरं तर, ते भारतातील प्रत्येक राज्यात घेतले जाते.
हळदीचे सर्वाधिक उत्पादन तामिळनाडू राज्यात
भारतात हळदीचे सर्वाधिक उत्पादन तामिळनाडूमध्ये होते. म्हणजेच हळदीच्या उत्पादनात हे राज्य आघाडीवर आहे. येथील शेतकरी दरवर्षी मुबलक प्रमाणात हळदीची लागवड करतात. देशातील एकूण हळद उत्पादनात तामिळनाडूचा वाटा 28.09 टक्के आहे.
हळद उत्पादनात अग्रेसर असलेली चार राज्ये
हळद उत्पादनात अग्रेसर असलेल्या पहिल्या चार राज्यांमध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 22.34 टक्के हळदीचं उत्पादन घेतलं जाते. त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. येथील शेतकरी 11.14 टक्के हळदीचे उत्पादन घेतात. आंध्र प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याचा एकूण वाटा 6.35 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या: