वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
कॅनडामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. यातील बहुतांश लोक हे भारतीय आहेत.
Waiter Job : अनेकजण चांगली नोकरी (Job), पैसा (Money) मिळवण्यासाठी परदेशात जातात. पण परदेशात त्यांना चांगली नोकरी किंवा भरपूर पैसा मिळेलच असे नाही. बऱ्याचवेळा चांगली नोकरी मिळत नाही. अशीच काही भीषण वास्तव सांगणारी घटना कॅनडातून समोर आली आहे. कॅनडामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दोन दिवसांत 3000 हून अधिक लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केला. विशेष म्हणजे, यातील बहुतांश लोक हे भारतीय आहेत.
मुलाखतीसाठी आलेले बहुतांश लोक हे भारतीय
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे असलेल्या 'तंदूरी फ्लेम' या रेस्टॉरंटने वेटर आणि सर्व्हेंटच्या पदासाठी नोकरीची जाहिरात दिली होती. यानंतर या नोकरीसाठी अनेकांनी अर्ज केले. यामध्ये मुलाखतीसाठी आलेले बहुतांश लोक हे भारतीय होते. या पदासाठी अवघ्या दोन दिवसांत 3000 उमेदवार आले. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमीटमध्ये 35 टक्के कपात कॅनडा हे भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. तिथे स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून वर्क परमिट, कायमस्वरूपी वास्तव्य आणि नंतर नागरिकत्व मिळवणे अगदी सोपे झाले आहे. मात्र, येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला जाण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. कारण कॅनडाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा 35 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
महत्वाच्या बातम्या: