Share Mareket : 'या' तीन कंपन्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का? मग इकडे लक्ष द्या... उद्याचा दिवस महत्त्वाचा
आयटी क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्यांच्या तिमाहीचा आर्थिक निकाल येणार असून त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होण्याची शक्यता आहे.
मुंबई : बुधवार हा आयटी क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. टीसीएस (TCS), विप्रो (Wipro) आणि इन्फोसिस (Infosys) या तिन्ही आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे बुधवारी डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल येणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असल्यानं त्यांच्या तिमाही निकालावर संपूर्ण शेअर बाजाराचं लक्ष असणार आहे. तर जसे निकाल येतील त्याचे परिणाम हे या कंपन्यांच्या शेअर्ससह मार्केटवर देखील दिसून येऊ शकतं.
कसे असतील विप्रो, इन्फोसिस आणि टीसीएसचे तिमाही निकाल?
इन्फोसिसच्या गेल्या तिमाही महसुलात 4 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने हीच महसुली वाढ 4.8 टक्के इतकी दर्शवली आहे.
तिमाही नफ्याच्या क्रमवारीत विप्रो दुसऱ्या स्थानी राहण्याचा अंदाज आहे. विप्रोचा गेल्या तिमाहीतला महसूल हा 3.7 टक्के होऊ शकतो. म्हणजेच महसूल 20 हजार 399 कोटीपर्यंत होऊ शकतो. तर मूळ नफा हा दोन हजार 979 कोटींचा होऊ शकतो.
आयटी क्षेत्रातील तिसरी महत्त्वाची कंपनी म्हणजे टीसीएस. टीसीएसचा मूळ नफा हा 2.3 टक्के इतका होऊ शकतो. म्हणजेच कर अदा केल्यानंतर आठ हजार 701 कोटींचा एकूण नफा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे बुधवारी दुपारी साडे तीन वाजल्यानंतर या तिन्ही कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. शेअर बाजार बंद झाल्यानंतर निकाल येणार असल्यानं शेअरमध्ये काही प्रमाणात उतार चढाव दिसू शकतो. पण लगेच तितक्या मोठ्या प्रमाणात फरक दिसण्याची शक्यता काहीशी कमी आहे. पण निकाल जसे येतील त्यानुसार गुरुवारी मात्र याचा परिणाम जास्त दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- Share Market : Sensex 193 अंकांनी तर Nifty 44 अंकांनी वधारला; जाणून घ्या आज कोणते शेअर्स वधारले
- Share Market : Sensex आणि Nifty म्हणजे काय? डिमॅट अकाऊंट कसं काढायचं? जाणून घ्या सर्वकाही
- गेल्या वर्षी IPOचा बोलबाला; या वर्षीचे आयपीओ करणार तुम्हाला मालामाल